Pune News : पुणे : शहरात गर्दीच्या ठिकाणी स्वच्छ स्वच्छतागृहे उपलब्ध व्हावीत, नागरिकांची कुचंबणा होऊ नये, यासाठी खासदार विकास निधीतून भाजपचे माजी खासदार अनिल शिरोळे यांनी अत्याधुनिक आणि स्वयंचलित ई-टाॅयलेटच्या उभारणीसाठी निधी उपलब्ध करून दिला होता. त्यानुसार शहरात १५ ठिकाणी ई-टाॅयलेट उभारण्यात आली. मात्र, सध्या त्यापैकी केवळ तीन टाॅयलेट सुरू असल्याची वस्तुस्थिती आहे. करदात्यांच्या पैशातून उभारण्यात आलेली ई-टाॅयलेट बंद असल्याने, सिंहगड रस्त्यावरील राजाराम पुलाजवळ निषेधाचे फलक लावण्यात आले असून, या फलकांची जोरदार चर्चा झाली. प्रत्येकी २० लाख रुपये खर्च करून उभारलेली ही टाॅयलेट तत्काळ सुरू करावीत, अशी मागणी होत आहे.
केवळ तीन ई स्वच्छतागृहे सुरू
सार्वजनिक स्वच्छतागृहांची आवश्यकता लक्षात घेऊन भाजपचे माजी खासदार अनिल शिरोळे यांनी अत्याधुनिक आणि स्वयंचलित ई-टाॅयलेटच्या उभारणीसाठी निधी उपलब्ध करून दिला होता. त्यानुसार शहरात १५ ठिकाणी ई-टाॅयलेट उभारण्यात आली. (Pune News ) या अत्याधुनिक ई-टाॅयलेटचे व्यवस्थापन आणि देखभाल-दुरुस्तीचे काम खासगी कंपनीला देण्यात आले. या कंपनीबरोबरचा करार दोन वर्षांपूर्वी संपला आणि त्यानंतर ई-टाॅयलेट बंद पडली. खासगी कंपनीबरोबरचा करार संपुष्टात आल्यानंतर महापालिका प्रशासनाकडून करार सुरू करण्यास विलंब झाला. सध्या ही प्रक्रिया करण्यात आली असली, तरी केवळ तीन स्वच्छतागृहे सुरू आहेत.
ई-टाॅयलेटचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे मानवरहित स्वच्छता आणि स्वयंचलित प्रणाली ही आहेत. नाणे टाकल्यानंतरच स्वच्छतागृहाचा वापर करता येतो. स्वच्छतागृहाचा वापर झाल्यानंतर तत्काळ त्याची साफसफाई यंत्राद्वारे केली जाते. साफसफाई झाली नाही, तर स्वच्छतागृहांचा वापर करता येत नाही. देशातील अनेक शहरांत या प्रकारच्या टाॅयलेटची उभारणी करण्यात आली आहे.(Pune News ) पुणे शहरात देखील महत्त्वाच्या रस्त्यांवर स्वयंचलित स्वच्छतागृहे उभारण्यात आली. यातील सिंहगड रस्ता उड्डाणपूल आणि सेनापती बापट रस्त्यावरील मेट्रो मार्गिकेच्या कामांमुळे टाॅयलेट हटविण्यात आली आहेत. तर इतर अनेक स्वच्छतागृहे बंद आहेत.
सिंहगड रस्त्यावरील राजाराम पुलाजवळ या घटनेचा निषेध करण्यासाठी फलक लावण्यात आले आहेत. अभिजीत वारवकर यांनी त्याबाबत आवाज उठविला असून, प्रत्येकी २० लाख रुपये खर्च करून उभारण्यात आलेली टाॅयलेट सुरू करावीत, अशी मागणी त्यांनी केली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : गेट उघडण्यास उशीर झाला; सिक्युरिटी गार्डला बेशुद्ध पडेपर्यंत मारहाण
Pune News : तरुणाचे अपहरण करून, निर्जन स्थळी नेऊन अनैसर्गिक अत्याचार; तिघांविरोधात गुन्हा दाखल
Pune News : नवले पुलाजवळ मोटारीच्या धडकेने पादचारी महिलेचा मृत्यू