Pune News : पुणे : शहरात नोकरीच्या आमिषातून अनेकांची फसवणूक केली जात असल्याचे अनेक प्रकरणे वारंवार समोर येताना दिसून येत आहेत. तरुणांना खासगी सुरक्षा रक्षकाचे नोकरीचे आमिष दाखवत त्यांची आर्थिक फसवणूक केली जात आहे. अलिकडे याप्रकारे आर्थिक फसवणूकींच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळही अलर्ट झाले आहे. “खासगी सुरक्षा रक्षक भरतीसाठी युवकांनी कोणत्याही आमिषांना बळी पडू नये,’असे आवाहन सरकारी कामगार अधिकाऱ्यांनी केले आहे. (cheating of youth in the name of security guard recruitment in Pune; ‘Alert’ from the Board)
फसवणूकींच्या घटनांमध्ये मोठी वाढ
खासगी सुरक्षा रक्षकांच्या सेवाशर्ती आणि वेतनाबाबत कार्यासाठी पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाची स्थापना झाली आहे. याच मंडळात नोकरी लावण्याचे आमिष काही भामट्यांनी युवकांना दाखवत त्यांच्याकडून पैसे उकळल्याचे प्रकार घडले आहेत. (Pune News) याबाबत मंडळाकडे तक्रारी वाढल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर मंडळानेच पुढाकार घेत, या इच्छुकांना अलर्ट देत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.
याप्रकाराला आळा घालण्यासाठी मंडळाचे सचिव तथा सरकारी कामगार अधिकारी श्रीकांत चोभे यांनी माहिती म्हणाले की, पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळात भरती अथवा नोंदणी प्रक्रियेसाठी प्रति उमेदवार 110 रुपये शुल्क आकारले जाते. (Pune News) दरम्यान, सध्या मंडळामार्फत कोणत्याही प्रकारची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली नाही. उलट 1205 उमेदवार प्रतीक्षा यादीत आहेत. भविष्यात अशी प्रक्रिया राबवल्यास आम्ही कायदेशीर पद्धतीने जाहिरात देऊनच अर्ज मागवू. पण, काही लोक भरतीच्या नावे इच्छुकांकडून पैसे उकळत असल्याचे समोर येत आहे. इच्छुकांनी अशा घटकांशी कोणताही आर्थिक व्यवहार करू नयेत.
पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळात सुरक्षा रक्षकाची नोकरी लावून देतो, असे कोणी सांगून पैसे उकळत असल्यास संबंधित उमेदवाराने सावध राहावे. (Pune News) शिवाय, आपल्या जवळील पोलीस ठाण्यात तक्रार करावी.असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी श्रीकांत चोभे यांनी केले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : ‘वर्क फ्रॉम होम’चा मोह नडला; पुण्यातील ‘आयटी’तील दोघांना 50 लाखांचा गंडा
Pune News : जीवनसाथी डॉट कॉम साईटवरून ओळख झालेल्या तरुणाने तरुणीची केली २३ लाखांची फसवणूक