Pune News : पुणे : भारतीय जनता पक्षाच्या नेत्याने बिल्डरला मारहाण केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाल्यामुळे उद्योजक आणि बिल्डरांबरोबरच पटेल समाजातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आवारात ही घटना घडली आहे. यामुळे भाजपच्या अडचणी वाढणार असल्याचे लक्षात येताच आमदार महेश लांडगे यांनी पटेल समाजाची माफी मागितली आहे.
आमदार महेश लांडगे यांनी मागितली पटेल समाजाची माफी
भाजपच्या माजी नगरसेविका सारिका बोऱ्हाडे यांचे पती आणि भाजप नेते नितीन बोऱ्हाडे यांनी जमिनीच्या व्यवहारातील वादातून बिल्डर नरेश पटेल यांना पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आवारातच लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. (Pune News) बोऱ्हाडे यांचे चुलते आणि नरेश पटेल यांची जमीन शेजारी आहे. त्या जागेतून जाणाऱ्या डीपी मार्गावरून हा वाद झाला. पिंपरी-चिंचवड महापालिकेत यावर सुनावणी झाली. त्या सुनावणीनंतर बोऱ्हाडे यांनी पटेल यांना मारहाण केली. मारहाणीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाल्यानंतर पटेल समाज आक्रमक झाला आहे.
दरम्यान, नितीन बोऱ्हाडे हे आमदार महेश लांडगे यांचे कट्टर समर्थक आहेत. यामुळे महेश लांडगे यांच्या अडचणी वाढल्या होत्या. (Pune News) या सर्व प्रकारामुळे आमदार लांडगे यांनी पटेल समाजाची माफी मागितली. बोऱ्हाडे आणि पटेल यांची बैठक घेऊन, हा वाद सामोपचाराने मिटवला जाईल. यापुढे असे प्रकार होणार नाही याची काळजी घेऊ, असे आमदार महेश लांडगे यांनी सांगितले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : नॅशनल कराटे तायक्वांदो स्पर्धेत डोर्लेवाडीतील शिवतेज जाधवला सुवर्ण..
Pune News : राष्ट्रीय बाल स्वास्थ्य व आयुष्मान भव योजनेचे सुप्रिया सुळे यांच्या हस्ते उद्घाटन
Pune News : किरकोळ भांडणातून तरुणीला ॲसिड फेकून मारण्याची धमकी ; दोघांवर गुन्हा दाखल..