Pune News : पुणे : खून करून तब्बल दीड महिन्यांपासून पोलिसांना चकवा देणाऱ्या एका अट्टल गुन्हेगाराला बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली आहे.
तब्बल दीड महिन्यापासून होता फ़रार
संकेत उर्फ मोन्या संतोष विकारे (वय-२७, रा. राजगड चाळ, राजीव गांधी नगर, बिबवेवाडी, पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. तर श्रीकांत मच्छिंद्र जाधव (वय-३८, रा. राजीव गांधी नगर, बिबवेवाडी, पुणे) असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीकांत जाधव व त्यांचे मित्र हे राजगड चाळीच्या कॉर्नरला २४ मे २०२३ रोजी गप्पा मारत उभे होते. त्यावेळी आरोपी सुनिल पारेकर याने श्रीकांत जाधव यांना शिवीगाळ करून हाताने मारले होते.
त्यानंतर श्रीकांत जाधव हे पोलिस चौकीच्या दिशेने जात असताना आरोपी सुनिल पारेकर आणि त्याच्या इतर दोन साथीदारांनी त्याच्यावर विटांनी जोरदार हल्ला चढविला. (Pune News ) या हल्ल्यात श्रीकांत हे गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, आरोपी मोन्याविरूध्द मोक्का, खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, दरोडा, विनापरवाना पिस्टल बाळगणे सह इतर गंभीर गुन्हे दाखल आहेत. खून झाल्यापासून आरोपी मोन्या विकारे हा फरार होता. बिबवेवाडी पोलिसांचे पथक त्याच्या मागावर होते.
पोलीस पथकातील अंमलदार अभिषेक धुमाळ यांना मोन्या हा बिबवेवाडी परिसरात येणार असल्याची माहिती एका खबऱ्या मार्फत माहिती मिळाली होती.(Pune News ) मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा रचून आरोपी मोन्याला मोठ्या शिताफीने बेड्या ठोकल्या.
हि कारवाई बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक सविता ढमढेरे , पोलिस निरीक्षक (गुन्हे) अनिता हिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे प्रम्मुख सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रविण काळुखे , पोलिस उपनिरीक्षक संजय आदलिंग , पोलिस हवालदार संतोष जाधव, अभिषेक धुमाळ, शिवाजी येवले, प्रणव पाटील, सतिश मोरे, ज्योतिबा काळे, तानाजी सागर आणि अतुल महांगडे यांच्या पथकाने केली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद गोकुळे यांची बदली…