Pune News : पुणे : परदेशातून मनी ट्रान्सफरमार्फत पैसे पाठविल्यास, ते जमा होण्यास २४ तासांचा कालावधी लागू शकतो. याचाच गैरफायदा घेऊन सायबर चोरट्यांनी येरवड्यातील कुटुंबाला तब्बल ३ लाख ७० हजारांचा गंडा घातला आहे.
येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल
कॅनडामध्ये असलेल्या नातेवाईकाने व्हिसा नुतनीकरणासाठी पैसे पाठविले असून, त्याची बँकेची बनावट रिसिट पाठवली. एजंटाला हे पैसे पाठवा, असे सांगून या कुटुंबाची फसवणूक केली आहे. याबाबत येरवडा येथे राहणार्या एका ३८ वर्षांच्या नागरिकाने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Pune News) परदेशातून मनी ट्रान्सफरमार्फत पैसे पाठविल्यास ते जमा होण्यास २४ तासांचा कालावधी लागू शकतो, याचा गैरफायदा घेऊन सायबर चोरट्यांनी गंडा घातला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या आईचे अनेक नातेवाईक परदेशात वास्तव्याला आहेत. एकदा त्यांना फोन आला आणि मी परदेशातून बोलत असल्याचे सांगितले. तुझी आई मला चांगली ओळखते, असे सांगत आईला आवाज ओळखण्यास सांगितले. आईने अनेक नातेवाईकांची नावे घेतली. त्याचवेळी भामट्याने चलाखीने आईने घेतलेल्या रिंकू या नावाची मीच व्यक्ती आहे, (Pune News) असे सांगत गोड बोलून विश्वास संपादन केला. एजंटमार्फत मी कॅनडा येथे जॉबसाठी आलो आहे, असे सांगत, माझ्या व्हिसाची मुदत आज संपणार आहे. मुदत न वाढविल्यास मला भारतात पुन्हा पाठवण्यात येईल. त्यासाठी मला व्हिसा मुदत वाढविण्यासाठी ३ लाख ७० हजार रुपयांची मदत करा, असे त्यांनी सांगितले.
आपल्या परिचयाची व्यक्ती मदत मागत असल्याने भाबडेपणाने विश्वास ठेवला. संबंधित भामट्याने पुन्हा फोन करून, एजंटला पैसे पाठवण्यास सांगितले. (Pune News) त्यानंतर त्याने फिर्यादीच्या आईच्या व्हॉटसअॅपवर वेस्टन युनियन या मनि ट्रान्सफरद्वारे ६ लाख ४५ हजार ४३६ रुपये त्यांच्या बँक खात्यावर पाठविल्याची रिसीट पाठविली. त्यानंतर फिर्यादींनी बॅंकेच्या मनिट्रान्सफरच्या कार्यालयात भेट दिली असता, पैसे २४ तासांत बँक खात्यात जमा होतील, असे सांगण्यात आले. दरम्यान, एजंटाचा पैसे पाठविण्यासाठी तगादा सुरूच होता.
दरम्यान, फिर्यादीने स्वत:च्या खात्यातून भोपाळ येथील सागर सिंग या एजंटला ३ लाख ७० हजार रुपये पाठविले. मात्र, २४ तासानंतरही बँक खात्यात पैसे जमा न झाल्याने (Pune News) त्यांनी एजंटला फोन करुन पैसे परत करण्यास सांगितले. तेव्हा त्याने पैसे परत देण्यास टाळाटाळ केल्यानंतर आपली घोर फसवणूक झाल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले. याप्रकरणी सायबर पोलिसांनी प्राथमिक तपास करुन हा गुन्हा येरवडा पोलिसांकडे हस्तांतरीत केला आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : पुण्यात गावगुंडांची दहशत; अज्ञातांकडून मध्यरात्री ४ रिक्षांची जाळपोळ
Pune News : पुण्याचा श्रीमंत दगडूशेठ हलवाई बाप्पा बसणार यंदा अयोध्येतील प्रभू राम मंदिरात!
Pune News : यंदाच्या गणेशोत्सवात “अग्निसुरक्षित गणेश मंडळ” स्पर्धा; आगीच्या घटना टाळणार