Pune News : पुणे : ताथवडे शहरात एका टँकरमधून गॅस चोरी करताना एकापाठोपाठ तब्बल नऊ टाक्यांचा स्फोट झाल्याची धक्कादायक रविवारी (ता.०८) रात्री पावणे अकरा सुमारास उघडकीस आली आहे. या स्फोटात ३ स्कूल बस जळाल्या आहेत. या स्पोटांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले होते. ज्याठिकाणी गॅस टँकरचा स्फोट झाला, त्या परिसरात शाळा, महाविद्यालये, विद्यार्थ्यांचे हॉस्टेलसुद्धा आहेत. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर येत आहे.
नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
मिळालेल्या माहितीनुसार, ताथवडे जेएसपीएम महाविद्यालयाजवळील मोकळ्या जागेत गॅस सिलेंडर असलेला एक टँकर होता. या टँकरमधील गॅस अवैधरित्या घरगुती गॅस सिलेंडरमध्ये भरण्याचे काम सुरू होते. या गॅसचा आगीशी संपर्क आल्याने आग लागली.(Pune News) त्यावेळी तिथे उपस्थित असलेले सर्वजण पडून गेले असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
त्यानंतर क्षणार्धात आगीने रौद्ररूप धारण केले. आणि तेथे असलेल्या तब्बल नऊ गॅस सिलेंडरचा एका मागोमाग एक असा स्फोट होत गेला. त्यामुळे तेथील तीन स्कूल बसनेही पेट घेतला. (Pune News) या घटनेची माहिती मिळताच, घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आगीवर रात्री पावणे बाराच्या सुमारास नियंत्रण मिळवले.
दरम्यान, पोलीस उपायुक्त शिवाजी पवार, सहाय्यक आयुक्त विठ्ठल कुबडे, पोलीस निरीक्षक मनोज खंडाळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. (Pune News) पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला असून टँकर चालकांसह गॅस चोरट्यांचा शोधही सुरू आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : रेल्वेत नोकरीचे खोटे नियुक्तीपत्र देऊन तरुणांची फसवणूक