Pune News : पुणे : पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या भरती प्रक्रियेत बनावट प्रमाणपत्र सादर करणाऱ्या उमेदवाराला चतु:शृंगी पोलिसांनी बेड्या ठोकल्या. (Arrested for issuing fake certificates for police recruitment)
मिळालेल्या माहितीनुसार, सचिन वाघमोडे असे अटक करण्यात आलेल्या उमेदवाराचे नाव आहे. पुणे ग्रामीण पोलीस दलातील भरती प्रक्रिया नुकतीच पार पडली.
चतु:शृंगी पोलिसांची कारवाई
वाघमोडे भरती प्रक्रियेत सुशिक्षित बेरोजगार अंशकालीन (पीटीई) प्रमाणपत्र सादर केले होते. भरती प्रक्रियेत मैदानी आणि लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची गुणवत्ता यादीनुसार निवड करण्यात आली. (Pune News ) निवड झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्याचे काम सुरू असताना वाघमोडेने सादर केलेले प्रमाणपत्र बनावट असल्याचा संशय पोलिसांना आला.
त्यानंतर बीड येथील तहसील कार्यालयात पोलिसांनी चौकशी केली. तेव्हा बीडमधील तहसील कार्यालयातून वाघमोडेला प्रमाणपत्र देण्यात आले नसल्याचे उघड झाले. (Pune News ) त्यानंतर वाघमोडे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक भालेराव तपास करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : पुण्यात पोलीस असल्याचा बनाव करत तरुणीला घातला 7 लाखांचा गंडा
Pune News : बार्टीच्या आश्वासनानंतर संशोधक विद्यार्थ्यांचे आंदोलन मागे