Pune News : पुणे : नवले पुलावरील अपघातांचे सत्र रोखण्यासाठी प्रशासनाच्या पातळीवर अनेक उपाययोजना सुरू आहेत. असे असताना पुलावरील अपघातांची मालिका थांबतच नसल्याचे चित्र आहे. मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर नवले पुलाजवळ सिग्नलला थांबलेल्या वाहनांना सिमेंट वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रकने धडक दिल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. ट्रकने मोटारी आणि दुचाकींना दिलेल्या धडकेत एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला असून, पादचारी महिला जखमी झाली आहे. संदेश बानदा खेडकर (वय ३४, रा. टिळेकर नगर, कात्रज- कोंढवा रस्ता) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.
ट्रकने चार ते पाच वाहनांना दिली धडक
याप्रकरणी ट्रकचालक पंकज राजाराम नटकरे (वय २१, रा. बसवकल्याण, बिदर, कर्नाटक) याला सिंहगड रस्ता पोलिसांनी अटक केली आहे. (Pune News) याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवले पूल परिसरात सिग्नलवर वाहने थांबली होती. बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या ट्रकचालकाचे नियंत्रण सुटले. ट्रकने चार ते पाच वाहनांना धडक दिली.
या अपघातात दुचाकीस्वार संदेश गंभीर जखमी झाला, तसेच एक पादचारी महिला जखमी झाली. दरम्यान, संदेश यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. (Pune News) मात्र, उपचारांपूर्वीच त्यांचा दूर्दैवी मृत्यू झाला. या अपघातानंतर बाह्यवळण मार्गावरील वाहतूक काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.
वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला काढली. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली, अशी माहिती सिंहगड वाहतूक विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग वाघमारे यांनी दिली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : पत्नी सुंदर दिसत नाही म्हणून छळ; कौटुंबिक न्यायालयाचा पतीला दणका
Pune News : व्यापार व आर्थिक विकासाला चालना देण्यात मानकांची भूमिका महत्त्वाची : ज्ञान प्रकाश