Pune News : पुणे : ड्रग्स माफीया ललित पाटील दोन दिवसांपूर्वी ससून रुग्णालयातून फरार झाल्यानंतर रुग्णालय आणि पोलीस प्रश्सनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा प्रशासन अलर्ट झाले असून, तातडीने काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. ससून रुग्णालयात उपचार घेणाऱ्या दोन कैद्यांना तातडीने डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामध्ये एक पुरुष तर एक गर्भवती महिला कैद्याचा समावेश आहे.
घेतले हे महत्त्वपूर्ण निर्णय
ससून रुग्णालयातून ड्रग्स रॅकेट चालवणारा ललित पाटील बंदोबस्तावरील पोलिसांना गुंगारा देऊन पळून गेल्यानंतर पुणे जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. (Pune News) पुणे जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा जोमाने कामाला लागली आहे. पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांकडून आरोग्य यंत्रणेचा आढावा घेण्यात आला आहे.
येरवडा येथील राजीव गांधी रुग्णालयाला भेट देत आयुक्तांनी रुग्णालयाचा आढावा घेतला. यावेळी रुग्णालयाला लागणाऱ्या आवश्यक सुविधांची त्यांनी पाहणी केली. (Pune News) राजीव गांधी रुग्णालयात लवकरच वैद्यकीय अधिकाऱ्यांची भरती करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी रुग्णालयाला नव्याने निधी देण्याचे आश्वासन आयुक्तांकडून देण्यात आले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : घरगुती वादाच्या कारणातून ३४ वर्षीय तरुणाची खडकवासला धरणात उडी घेऊन आत्महत्या..
Pune News : पैशांच्या वादातून मित्राच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार