Pune News : पुणे : पुण्यातील रविवार पेठेतील यशवर्धन प्रेस्टीज सोसायटीत पाचव्या मजल्यावर भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत सदनिकेत अडकलेल्या श्वानाची सुखरूप सुटका केली. ही दूर्घटना बुधवारी (ता. १८) दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास घडली. या दूर्घटनेनंतर घर जळून खाक झाले आहे.
आगीमध्ये घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान
दरम्यान, इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून धुराचे लोट उसळत असल्याचे लक्षात आल्यावर अग्नीशामक दलाचे जवान तत्काळ घटनास्थळी पोहोचले. जवानांनी कटावणीचा वापर करीत दरवाजा तोडून आत प्रवेश केला. (Pune News) त्यावेळी घरामधील गृहोपयोगी वस्तू पेटल्या होत्या. जवानांनी आगीवर पाण्याचा मारा सुरू केला. घरामध्ये कोणी अडकले आहे का याची खात्री करीत असताना अचानक स्वयंपाकघरातून एक श्वान बचावासाठी प्रयत्न करत असल्याचे जवानांनी पाहिले. तत्काळ त्यांनी त्या मुक्या जीवाला बाहेर काढले. सुदैवाने श्वान सुखरुप होता.
दरम्यान, जवानांनी पाण्याचा मारा करीत सुमारे १५ मिनिटांनंतर आग आटोक्यात आणली. ही आग इलेक्ट्रिक शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा अंदाज आहे. आगीमध्ये घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या सदनिकेमध्ये एक महिला व सोबत तिने पाळलेले श्वान राहत होते. महिला कामावर गेल्याने श्वान घरात एकटाच होता. (Pune News) आग लागल्याची घटना समजताच घराची मालक असलेली महिला येताच तिने एक बोलकी प्रतिक्रीया व्यक्त केली.
घरमालक महिला म्हणाली की, माझे घर जळाल्याचे दुःख आहेच; पण माझ्या “रानू” या श्वानाला सुखरुप वाचविल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार मानते. (Pune News) असे म्हणून त्यांनी जवानांना सलाम केला.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : ललित पाटीलच्या दोन मैत्रिणींना नाशिकमधून अटक; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश होणार?
Pune News : मेसेज पाठवल्याच्या वादातून तरुणावर शस्त्राने वार करुन खून; चौघांना अटक