Pune News : पुणे : हडपसर परिसरातील हांडेवाडी येथील श्रीराम चौकामध्ये श्रीरामाचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या शिवसेनेचे तत्कालीन नगरसेवक प्रमोद उर्फ नाना भानगिरे यांच्या प्रस्तावाला अखेर मान्यता मिळाली आहे. त्यामुळे लवकरच हांडेवाडी येथे प्रभू श्रीराम यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार आहे. महापालिकेच्या मुख्य सभेने प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर तो अभिप्रायासाठी राज्याच्या नगरविकास विभागाकडे पाठविण्यात आला होता. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतर महापालिकेने या प्रस्तावाला अंतिम मंजुरी दिली आहे.
प्रस्तावाला नगरविकास विभागाकडून मान्यता
शिवसेनेचे तत्कालीन नगरसेवक प्रमोद उर्फ नाना भानगिरे यांनी महापालिकेला २०१८ मध्ये हांडेवाडी येथील श्रीराम चौकामध्ये रामाचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचा प्रस्ताव दिला होता. या खर्चाला महापालिकेने मान्यता द्यावी, असे या प्रस्तावात भानगिरे यांनी नमूद केले होते. (Pune News) दरम्यान, महंमदवाडी-कौसरबागमधील हांडेवाडी येथे हा पुतळा उभारण्याचे नियोजित होते. या प्रस्तावाला स्थायी समितीने आणि त्यानंतर महापालिकेच्या मुख्य सभेने मान्यता दिली होती. मात्र, सार्वजनिक ठिकाणी पुतळा उभारायचा झाल्यास त्यासाठी राज्य शासनाच्या नगरविकास विभागाची मान्यता घेणे आवश्यक आहे. त्यामुळे महापालिकेकडून हा प्रस्ताव राज्य शासनाच्या नगरविकास विभागाला पाठविण्यात आला होता.
दरम्यानच्या काळात राज्यातील सत्ता समीकरणे बदलली आणि एकनाथ शिंदे आणि भाजपचे सरकार राज्यात आले. भानगिरे यांनीही एकनाथ शिंदे यांना समर्थन दिले. सध्या ते शहरप्रमुख आहेत. या प्रस्तावाला नगरविकास विभागाकडून मान्यता मिळावी, यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. (Pune News) त्यामुळे नगरविकास विभाग, गृह विभाग आणि पोलीस महासंचालक कार्यालयाकडूनही या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. त्याबाबत महापालिकेला कळविण्यात आल्यानंतर महापालिकेनेही या प्रस्तावाला मंजुरी दिली. महाविकास आघाडीचे सरकार असताना हा प्रस्ताव रखडला होता.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : सिमेंटच्या ब्लॉकने वाहतूक पोलिसावर जीवघेणा हल्ला; लष्करी जवानाला अटक
Pune News : सणसवाडीतील संघर्ष यात्रेत रोहित पवारांचा महागाई, बेरोजगार, कंत्राटी भरतीवर हल्लाबोल
Pune News : महाराष्ट्राने एक गोड आवाजाचा नादब्रह्म कायमचा गमावला : ह.भ.प. पंकज महाराज गावडे