Pune News : पुणे : पती वेळ देत नाही म्हणून ३२ वर्षीय पत्नीने आयटी कंपनीला पतीच्या इमेलवरुन बॉम्ब ठेवल्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना चंदननगर परिसरात नुकतीच उघडकीस आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी महिलेला अटक केली आहे.
पुण्यातील घटना
मिळालेल्या माहितीनुसार, पती एका आयटी कंपनीत नोकरीला आहे. पण तो कामात व्यस्त असतो. वेळ देत नाही म्हणून पत्नी वैतागली होती. तर सदर महिला कोंढवा येथील (Pune News ) एका खासगी कोचिंग संस्थेत इंग्रजी शिक्षिका म्हणून काम करते. तिचे पती आयटी इंडस्ट्रीत कर्मचारी आहेत. मात्र, पतीने धमकीच्या ईमेलमध्ये नमूद केलेल्या कंपनीतील नोकरी नुकतीच सोडली आहे.
आयटी कंपनीत बॉम्ब असल्याचा खोटा दावा करणाऱ्या या ईमेलमुळे पोलिसांनी पतीला चौकशीसाठी ताब्यात घेतले. पोलिसांनी ईमेलमध्ये पतीचा फोन नंबर सापडला होता. (Pune News ) पोलिसांनी ईमेलचा आयपी अड्रेस शोधून काढला. धमकीचा मेला पतीच्या टॅबलेटवरून आला होता. चौकशीदरम्यान आरोपी महिलेने ईमेल पाठवल्याचे मान्य केले. पतीला धडा शिकवण्यासाठी बॉम्बची धमकी दिल्याचे महिलेने कबूल केले.
दरम्यान, महिलेला अटक करण्यात आली असून तिच्याविरुद्ध संबंधित कलमांनुसार चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune News ) पती कामात व्यस्त असतो. वेळ देत नाही म्हणून पत्नी वैतागली होती. यामुळे तिने नामी शक्कल लढवली व अंगलट आली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : अपंगत्व आले जरी, सुटली नाही विठ्ठल भक्ती…; अपंगात्वर मात करत भक्त निघाला पंढरपूरी!
Pune News : पुणे पोलीस दलातील ‘ते’ पोलीस तडकाफडकी निलंबीत