Pune News : पुणे : सायबर फसवणुकीच्या घटना शहरात वाढीस लागल्या आहेत. सायबर चोरटे अत्यंत सराइतपणे उच्चशिक्षित लोकांनाही आपल्या जाळ्यात अडकवत आहेत. पुण्यात झालेल्या सायबर गुन्ह्यात चोरट्यांनी चांगल्या परताव्याचे आमिष चक्क आयटी अभियंता असलेल्या एका महिलेला दाखवले असून, महिलेसह आठ जणांची २५.६५ लाखांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चंदननगर पोलिसांत गुन्हा दाखल
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, पुण्यातील एका ३६ वर्षीय महिला सॉफ्टवेअर इंजिनिअरबाबत हा प्रकार घडला आहे. महिलेसह एकूण आठ जणांची २५.६५ लाखांची फसवणूक झाली आहे. या प्रकरणी पुण्यातील चंदननगर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. (Pune News) फिर्यादीला ऑनलाइन इन्कमसंदर्भात मोबाईलवर मेसेज आला. या कामाच्या बदल्यात चांगले उत्पन्न मिळणार असल्याचे फिर्यादीला सांगण्यात आले. मग सुरुवातील कामाच्या बदल्यात काही रक्कम दिली. यामुळे फिर्यादीचा विश्वास संपादन करण्यात यश आले, अशी माहिती पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांनी दिली. जानेवारी ते एप्रिल महिन्यात ही घटना घडली आहे.
दरम्यान, अजून चांगले उत्पन्न मिळवून देण्याचे आमिष महिलला दाखवत सायबर चोरट्यांनी महिलेला गुंतवणूक करण्यास सांगितले. (Pune News) त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवत महिलेने ५.२२ लाख रुपये दिलेल्या बँक खात्यात वर्ग केले. त्यानंतर अजून पैशांची मागणी होऊ लागली. त्यानंतर आपली फसवणूक होत असल्याचे महिलेच्या लक्षात आले.
सायबर गुन्हेगारीवर आळा घालणे गरजेचे आहे. आपल्या बँकेचे डिटेल्स कोणासोबतही शेअर करु नका. घरबसल्या ऑनलाईन कामे देणाऱ्या या टोळ्यांपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : बोपदेव घाटातील ट्रिनिटी महाविद्यालयाजवळ गोळीबार? तपास सुरू