Pune News : पुणे : व्यवसायात तोटा झाल्याची बतावणी करून, तरुणीला बँकेकडून २६ लाख ६० हजार रुपयांचे कर्ज काढण्यास भाग पाडले. कर्जाचे हप्ते भरण्यास सांगितल्यावर समाजमाध्यमांमध्ये छायाचित्रे, तसेच ध्वनिचित्रफीत व्हायरल करण्याची धमकी देवून फसवणूक केल्याची घटना कोंढवा परिसरात घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी भामट्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
भामट्यावर गुन्हा दाखल
याप्रकरणी अमित चव्हाण याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Pune News) या तरुणीने विवाहविषयक संकेतस्थळावर नोंदणी केली होती. आरोपी चव्हाण याने रोहित राजाराम देशमुख या नावे विवाहनोंदणी संकेतस्थळावर माहिती दिली होती.
अधिक माहितीनुसार, या दोघांची ओळख एका विवाहनोंदणी संकेतस्थळावर झाली होती. या ओळखीचा गैरफायदा घेत, तरुणाने तरुणीशी गोड बोलून चांगले संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर तरुणी आणि आरोपी दोघेही एकमेकांच्या संपर्कात आले. (Pune News) चव्हाण याने तिला विवाहाचे आमिष दाखवून भेटायला बोलावले. त्याने तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून, लग्न करण्याच्या आमिषाने तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केला. तरुणीची अश्लील छायाचित्रे काढली.
दरम्यान, आपला आयात-निर्यात व्यवसाय असल्याचे त्याने माहितीत नमूद केले होते. या व्यवसायात तोटा झाल्याची बतावणी करून आरोपीने तरुणीला बँकेकडून २६ लाख ६० हजार रुपयांचे कर्ज काढण्यास भाग पाडले. हप्ते भरण्याची वेळ आली तेव्हा संबंधित तरुणाने त्याला हप्ते भरण्यास सांगितले. (Pune News) मात्र, भामट्याने हप्ते भरण्यास नकार देऊन, पुन्हा तगादा लावल्यास समाजमाध्यमांमध्ये छायाचित्रे, तसेच ध्वनिचित्रफीत प्रसारित करण्याची धमकी दिली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
या प्रकारामुळे घाबरलेल्या तरुणीने पोलिसांकडे धाव घेतली. कोंढवा पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.
Pune News : भटक्या श्वानाचे तोंड अडकले बरणीत; आठ दिवस उपासमार
Pune News : हप्ता देण्यास नकार देणाऱ्या दुकानदाराला टोळक्याची मारहाण ; तिघांना बेड्या..
Pune News