Pune News : पुणे : अवघ्या एक वर्षापूर्वी लग्न झालेल्या एका २२ वर्षीय सुनेन सासूच्या टोमणे आणि छळाला कंटाळून विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात आरोपी सासूवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सासूवर गुन्हा दाखल
सायली सौरभ भागवत (वय २२, रा. दत्तवाडी, पुणे) असे या मयत झालेल्या सुनेचं नाव आहे. याप्रकरणी रवी अनिल अहिरे ( वय ३९, रा, हिराबाग पुणे) याने फिर्याद दिली आहे. (Pune News ) त्यानुसार सासू राजेश्री राजेंद्र भागवत (साईबाबा मंदिर शेजारी, दत्तवाडी, पुणे) हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायली सौरभ भागवत हिचा राजेश्री राजेंद्र भागवत हिच्या मुलाशी एका वर्षापूर्वी विवाह झाला होता. विवाह झाल्यानंतर सासू राजेश्री ही सायली हिला वारंवार टोमणे देऊन तिचा मानसिक छळ करायची. (Pune News ) तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन खालच्या पातळीचे शब्द प्रयोग सातत्याने करायची असे फिर्यादीत म्हटले आहे.
सायलीने आत्महत्या केली त्या दिवशी, सासू राजेश्री हिने हीन दर्जची वागणूक देऊन तिच्या चारित्र्यावर संशय घेतला. तिला तू झोपडपट्टीमध्ये राहणारी चिंधी चोर आहेस, (Pune News ) तुला स्वयंपाक नीट बनवता येत नाही, असे म्हणत तिचा मानसिक छळ केल्याचा आरोप केला होता.
दरम्यान, सुनेला उपाशी पोटी ठेऊन, तिच्या नवऱ्यापासून अलिप्त राहण्यास भाग पाडले, तसेच तिला रात्री दोन वाजताच्या सुमारास घराबाहेर हाकलून दिले. (Pune News ) या जाचाला कंटाळून सायली हिने विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याचा आरोप आहे. या बाबत पुढील तपास खडक पोलीस स्टेशनचे पोलीस एल एन सोनवणे करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : एक कोटीचे कर्ज मंजूर करण्याच्या बहाण्याने एक लाख उकळले
Pune News : जीवे मारण्याची धमकी देत, दुचाकी घेऊन पसार; हडपसर ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल