Pune News : पुणे : मित्राला दिलेले १० हजार रुपये परत मागितल्याच्या रागाने पुणे परिवहन महामंडळ लिमिटेच्या (पीएमपीएल) चालकाचा (वय ५६ वर्षे) त्याच्या मित्रांनीच निघृण खून केल्याची खळबळजनक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. खून केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावताना आरोपी पकडले गेले. या प्रकरणी पुणे पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. या घटनेमुळे जांभुळवाडी परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
जांभुळवाडीत खळबळ
अधिक माहितीनुसार राजेंद्र बाजीराव दिवेकर (वय ५६ वर्ष, रा. जांभूळवाडी) हे पीएमपीएमएलमध्ये चालक म्हणून कार्यरत होते. सोमनाथ कुंभार व रोहित पाटेकर या त्यांच्या दोन मित्रांनीच त्यांचा खून केला. हे सर्वजण आंबेगावमधील जांभुळवाडीमध्ये राहत होते. (Pune News) चालक दिवेकर एका अपार्टमेंटमध्ये राहत होते तर इतर दोघे शेजारीच शेडच्या घरात राहत होते. दिवेकर यांच्याकडून सोमनाथ कुंभार याने काही महिन्यांपूर्वी आईच्या उपचारासाठी १० हजार रुपये घेतले होते.
दरम्यान, दिवेकर हे सोमनाथ कुंभार यांच्या घरी दहा हजार रुपये मागण्यासाठी गेले. त्यावेळी रोहित पाटेकर व कंभार दोघे मद्य प्राशन करत होते. दोघांनी मिळून दिवेकर यांचा खून केला. दिवेकर यांची पत्नी सकाळी कुंभार यांच्या घरी पतीला बोलावण्यासाठी गेली. तेव्हा त्यांना रक्त दिसले. (Pune News) त्यांनी घाबरून मुलगा वैभव दिवेकर याला कुंभार यांच्या घरी पाठवले, तेव्हा त्यांना आरोपी मृतदेहाची विल्हेवाट लावत असताना दिसले. तुझ्या वडिलांनी माझ्याकडून दहा हजार रुपये मागितले, त्यामुळे मी त्यांना देवाघरी पाठवले, असे उत्तर त्यांनी दिले.
या प्रकरणी वैभव दिवेकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : भावाला सत्तूरचा धाक दाखवून, गल्ल्यातील १५ हजार रुपये घेऊन पसार; एकाविरूद्ध गुन्हा दाखल
Pune News : पुणे शहर भाजपची जम्बो कार्यकारिणी अखेर जाहीर! माजी नगरसेवकांना प्राधान्य