Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Daund News : दौंडमध्ये यंदाचा गणपतीबाप्पा पावणार कोणाला?; राज्यात सत्तांतर झाल्याने गणेशोत्सवाला विशेष महत्व

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 18 September 2023, 17:10

गणेश सुळ
Daund News : केडगाव : सध्याचे वातावरण अक्षरशः गणपतीमय झाल्याचे दिसत आहे. ठिकठिकाणी गणरायाच्या आगमनाची जय्यत तयारी सुरु आहे. श्रीगणेश हे सबंध हिंदुस्थानाचे आराध्य दैवत आहे. म्हणूनच की काय या सणात अबालवृद्धांचा सहभाग पाहायला मिळतो. असे असले तरी या महोत्सवात प्रामुख्याने तरुणाईचाच उत्साह ओसंडून वाहत असतो.

राज्यात सत्तांतर झाल्याने दौंड तालुक्यात यंदाच्या गणेशोत्सवाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. जिल्हा परिषद पंचायत समिती तसेच ग्रामपंचायत निवडणूका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष, सभापती, सरपंच अशा विविध पदांवर विराजमान होण्यासाठी जो तो कंबर कसून आहे‌. (Daund News) चौकाचौकातील इच्छुक आतापासूनच गुडघ्याला बाशिंग बांधून बोहल्यावर चढण्याच्या तयारीत आहे. असे जरी असले तरी एकमेकांचे गूज मात्र कुणीच ऐकताना दिसत नाही.

इच्छुक मंडळी जनसंपर्क वाढवण्यासाठी प्रयत्नशील

रस्ते, वीज,पाणी हे मुलभूत प्रश्न आजही उत्तराच्या, निराकरणाच्या प्रतिक्षेत आहेत. जनतेच्या या प्रश्नांची उकल कोण करतो आणि दौंडच्या दुखऱ्या नसांवर विकासाची मलमपट्टी कोण लावतो हे येणारा काळच सांगेल. तूर्तास मात्र सगळीकडे गणपतीचे भक्तीमय वातावरण आहे. (Daund News) यानिमित्ताने विविध मंडळांना भेटी देणे, भरमसाठ वर्गणी, आरतीला हजेरी लावणे इ.प्रकारेही इच्छुक मंडळी जनसंपर्क वाढवण्यासाठी प्रयत्नशील दिसतील.

 

याप्रकारे जनतेला आकर्षित करण्यासाठी विविध विकासकामांच्या उद्घाटनांचे फवारे उडवले जात आहेत. ‘आपणच जनतेचे खरे सेवक आहोत’ अशी दिवास्वप्ने ज्याला-त्याला पडू लागली आहेत. दौंड शहर व दौंडमधील ग्रामीण परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरीकीकरण होताना दिसत आहे. (Daund News) गगनचुंबी इमारती उभ्या राहिलेल्या आहेत. या सोसायट्यांमधील रहिवासी हे उच्चशिक्षित आहेत. त्यामुळे त्यांच्या अपेक्षाही तितक्याच वास्तववादी आहेत. या सोसायट्यांवर वर्चस्व राखण्यासाठी तूफान रस्सीखेच होणार यात तिळमात्र शंका नाही. परंतु, पाण्याअभावी दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होत आहे. पिके जळून नष्ट होऊ लागली आहेत. जनावरे हिरव्या चाऱ्याअभावी हंबरडा फोडत आहे. दुष्काळग्रस्त शेतकरी कर्जबाजारी होऊ लागला आहे. याकडे मात्र कोणी लक्ष द्यायला तयार नाही.

निवडणुका रंगतदार होणार की चुरशीच्या?

तसे पाहता बिनीच्या शिलेदारांनी आपल्या तलवारी अजूनही म्यानातच ठेवलेल्या आहेत. ऐन रणधुमाळीतच त्यांचे दर्शन होईल, असे दिसते. एकंदरीत दौंड तालुक्यातील येणाऱ्या सर्व निवडणुका रंगतदार होणार की चुरशीची हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Daund News : देलवडी सेवा सोसायटीच्या वतीने १२ टक्के लाभांश वाटपाचा निर्णय

Daund News : दौंड उपजिल्हा रुग्णालयाच्या विस्तारित इमारतीचे बांधकाम प्रगतीपथावर; आमदार राहुल कुल यांनी घेतला आढावा

Daund News : दौंड क्रीडा संकुलातील विकासकामांसाठी २ कोटींचे अंदाजपत्रक

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post

Big Breaking : विधानसभा अध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर सुप्रीम कोर्टाची नाराजी; वेळकाढूपणा भोवला

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.