Pune News | पुणे : पुण्यात १० फुट खोल खड्ड्यात पडलेल्या गर्भवती गोमातेला अग्निशमन दलाच्या जवानांनी नवीन जीवदान दिले आहे. खड्ड्यात अडकलेल्या गायीला अग्निशमन दलाने सुखरूप बाहेर काढले. ही घटना पुण्यातील (Pune News) कोंढवा खुर्द भागात घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, सुनील कटके यांच्याजवळ असलेल्या जनावरांसाठी पाणी पिण्यासाठी एक खड्डा तयार केला. पाणी पिण्यासाठी गर्भवती गाय त्या ठिकाणी गेली असता तिला पाण्याचा अंदाज आला नाही आणि ती त्या १० फूट खड्ड्यात पडली. त्यानंतर कटके यांनी ही माहिती तात्काळ अग्निशमन दलाला दिली.
पट्ट्याच्या साह्याने गायीला बाहेर काढण्यात यश…
या घटनेची माहिती मिळताच काहीच वेळात अग्निशमन दलाचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. गाय गर्भवती असल्याकारणाने तिला कुठली ही इजा होता कामा नये हे लक्षात घेत एक जवान त्या खड्ड्यात उतरले. अग्निशमन दलाने दोरीचा वापर न करता पट्ट्याच्या साह्याने गायीला बाहेर काढण्यात यश मिळवले.
दरम्यान, गर्भवती गोमातेला अग्निशमन दलाच्या जवानाने नवीन जीवदान दिले. स्थानिकांनी अग्निशमन दलाचे अधिकारी आणि कर्मचारी यांचे कौतुक केले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
Good News : पुणे ते मुंबई थेट विमानसेवा होणार सुरु ; एअर इंडियाचा निर्णय
Satara News | नवीन रस्त्यात पडतात खड्डे…तरी काही करतात नेत्याचे ‘बर्थडे
Yavat News : अवकाळी पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान ; शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत