पुणे : पावसाच्याच्या कालावधीत महापालिकेची पर्जन्यमापक यंत्रणाच नादुरुस्त असल्याची माहिती समोर आली आहे. भर पावसाळ्यातच पर्जन्यमापक यंत्रणा दुरुस्तीचे काम आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून हाती घेण्यात आले आहे. मात्र या प्रकारामुळे महापालिका प्रशासनाचा बेजबाबदार कारभार चव्हाट्यावर आला आहे.
पावसाळ्यात उद्भवणारी पूरपरिस्थिती, जीवित आणि वित्तहानी, नदीत सोडले जाणारे पाणी, धरणांच्या पाणलोट क्षेत्रात होणारा पाऊस याचा सातत्याने आढावा घेतला जातो. त्यासाठी महापालिकेने पंधऱा क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत प्रत्येकी एक याप्रमाणे पंधरा पर्जन्यमापक यंत्रणा उभारली होती. सन २०१४ मध्ये ही यंत्रणा सर्व क्षेत्रीय कार्यालयाच्या ठिकाणी उभारण्यात आली. पर्जन्यमापक यंत्रणेच्या माध्यमातून प्रत्येक तासाला क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत झालेल्या पावसाची माहिती लघुसंदेशाद्वारे आपत्ती व्यवस्थापन विभागाला कळविली जाते.
पावसाळ्यातील शासननाने सतर्क राहून पावसाच्या नोंदीकडे लक्ष ठेवणे आवश्यक आहे. तसेच पूरपरिस्थितीबाबतची माहिती नागरिकांना देणे आहे. पण याच कालावधीत महापालिकेची पर्जन्यमापक यंत्रणाच नादुरुस्त आहे. आणि या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून आराखडा तयार केला जातो.