पुणे : विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी (दि.20) मतदान होणार आहे. मतदानाच्या दिवशी कर्मचा-यांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश महापालिक आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी नुकतेच आदेश जारी केले आहेत.
विधानसभेच्या मतदानाच्या दिवशी महापालिकेच्या अत्यावशक सेवा वगळता इतर सर्व कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मतदानाच्या दिवशी कर्मचाऱ्यांना आपला मतदानाचा हक्क बजाविता यावा यासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाने महापालिकेस दिले होते. त्यानुसार आदेश काढले आहेत.
याबरोबरच अत्यावश्यक सेवेत असणा-या कामगारांना मतदानाच्या दिवशी दोन तास सवलत देण्यात येणार आहे. तर या दिवशी सर्व कर्मचाऱ्यांनी मतदान केल्याचा अहवाल सर्व विभाग प्रमुखांना खातरजमा करून महापालिकेच्या कामगार कल्याण विभागास सादर करावा लागणार आहे.