–बापू मुळीक
सासवड : पुरंदरचे विमानतळ झाल्यानंतर सासवड शहराचा झपाट्याने विकास होणार आहे. या विकासात पुणे मेट्रोची भर पडणार आहे. मेट्रो ही विकासातील महत्त्वाची गुरुकिल्ली असणार आहे. भविष्यातील ही महत्त्वाची कामे करावयाची असतील तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या विचाराचा आमदार पुरंदर मधून निवडून देणे गरजेचे आहे. संभाजीराव झेंडे हे सर्व बाजूने योग्य असून हुशार व समाज काम करणारे उमेदवार आहेत. तेव्हा त्यांना घड्याळाच्या चिन्हा पुढील बटन दाबून प्रचंड बहुमताने निवडून द्यावे, असे आवाहन पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी केले.
सासवड( ता. पुरंदर) येथे पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघाचे महायुती व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार संभाजीराव झेंडे यांच्या प्रचारार्थ बैठकीचे आयोजन केले होते. त्यावेळी दुर्गाडे बोलत होते.
तालुक्यातील भाकरी फिरवण्याची गरज असल्याचे बबनराव टकले यांनी सांगितले. तालुक्यात प्रचार दौरे झाले. यावेळी विविध गावातून अनेक प्रश्न लोकांनी उपस्थित केले. ते सोडवायचे मी त्यासाठी निश्चित प्रयत्न करेल. दौरे संपल्यानंतर ज्याने त्याने आपल्या गावातच थांबायचे आहे. तसेच बूथ कमिट्यांनी तसेच कार्यकर्त्यांनी गाव सांभाळायचे आहे. समोरचे युतीचाच विरोधक हा थापाडा व लबाड आहे. त्यामुळे त्यांच्या भूलथाप्यांना बळी पडू नका. अजित दादा पवार यांचे हात बळकट करण्यासाठी आपल्यालाही मोठी संधी आहे. सर्वांनी याचा फायदा घेऊन विजयाच्या दिशेने गौडदौड करावी. सर्वांनी प्रामाणिकपणे काम करावे, गुलाल आपल्यावरच पडणार आहे, असे संभाजी झेंडे यांनी सांगितले.
पुरंदर तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असताना संभाजीराव झेंडे यांच्या माध्यमातून गरीब शेतकऱ्यांच्या जनावरांना चारा व पाणी उपलब्ध करून दिले. गरीब विद्यार्थ्यांना मोफत वहया वाटप सदाशिव अण्णा चरिष्टेबल ट्रस्टच्या वतीने करण्यात आल्याचेही माजी उपनगराध्यक्ष वामन जगताप यांनी सांगितले.
यावेळी दत्ता झुरंगे, उत्तम धुमाळ, अरुण जगताप, जेजुरीचे माजी नगराध्यक्ष रोहिदास कुंभार, शामकांत भिताडे, सासवड शहर अध्यक्ष निता सुभागडे, कलाताई फडतरे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित झेंडे, आत्माराम कांबळे, वंदना जगताप, बाळू तात्या यादव, परवीन पानसरे, हिरामण खेडेकर, प्रीती जगताप, रेवती कुंजीर, अनिल वाडकर, संदेश पवार आदी उपस्थित होते. दशरथ यादव यांनी सूत्रसंचालन केले. राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष उत्तम धुमाळ यांनी आभार मानले.