सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक
नरसापूर (पुणे): हानोई विद्यापीठ व्हिएतनाम यांचे वतीने २९ मे २०२५ ते १ जून २०२५ रोजी “ताय हो” जिल्हा होनोई व्हिएतनाम येथे “आधुनिक युगात बुद्ध विचाराची प्रस्तुतता” याविषयी आंतरराष्ट्रीय परिषद संपन्न होणार आहे. या परिषदेमध्ये ‘बुद्ध विचारांची यर्थाथता’, ‘जागतिक समस्या आणि बुद्ध विचार’, ‘बुद्ध विचारांची तत्त्वे’ इत्यादी विषयावर परिसंवाद होणार आहेत.
शंकरराव भेलके महाविद्यालय, नसरापूर येथील मराठी विभाग प्रमुख डॉ. जगदीश दिनकर शेवते यांची या परिषदेसाठी निवड झाली आहे. ‘बुद्धांचा पर्यावरणीय विचार’ या विषयावर ते शोधनिबंध सादर करणार आहेत. त्यासाठी भारतीय सामाजिक विज्ञान अनुसंधान परिषद (आय.सी.एस.एस.आर) यांस कडून प्रवास अनुदान मंजूर झाले आहे. या निमित्ताने आचार्य अत्रे विकास विकास प्रतिष्ठान, पुरंदर च्या वतीने डॉ. शेवते यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय कोलते म्हणाले प्राध्यापकांनी व संशोधकांनी नाविन्यपूर्ण संशोधन लेख लिहून अनेक गोष्टींवर प्रकाश टाकावा. साचेबद्ध तेच संशोधन टाळून नवीन गोष्टीवर अभ्यासपूर्ण प्रकाश टाकावा. संशोधनाची अनेक क्षेत्रे अभ्यासकांना खुणावत आहेत.
प्रतिष्ठानचे सचिव शांताराम पोमण , म.सा.प. सासवड शाखेचे अध्यक्ष एड.दिलीप निरगुडे , एड. अण्णासाहेब खाडे, कुंडलिक मेमाणे, हेमंत ताकवले, सुनील लोणकर उपस्थित होते.