Friday, June 12, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Yavat News : “घरासमोर फेऱ्या मारू नको” म्हटल्याच्या रागातून भरतगाव येथील शेतकऱ्याला चौघांनी केली मारहाण

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Thursday, 11 June 2026, 12:51

यवत, (पुणे) : “तू आमच्या घरासमोर विनाकारण फेऱ्या मारू नको,” असे सांगणाऱ्या एका 55 वर्षीय शेतकऱ्याला चौघांनी मिळून लाकडी दांडक्याने घरासमोर बेदम मारहाण केल्याची घटना घडली. भरतगाव (ता.दौंड) ग्रामपंचायत हद्दीत मंगळवारी (ता. 09) रात्री सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी भरतगाव येथील चौघांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शुभम माणिक डोंबाळे, दत्ता मल्हारी डोंबाळे, नवनाथ माणिक डोंबाळे (लाकडी दांडक्याने मारणारा), रामदास माणिक डोंबाळे (सर्व रा. भरतगाव, ता. दौंड, जि. पुणे) अशी मारहाण करणाऱ्या चौघांची नावे आहेत. तर कृष्णा शंकर डोंबाळे असे मारहाण झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कृष्णा डोंबाळे हे भरतगाव गावच्या हद्दीत आपल्या राहत्या घरासमोर सात वाजण्याच्या सुमारास हजर होते. यावेळी आरोपी शुभम डोंबाळे हा त्यांच्या घरासमोरून विनाकारण येण्या-जाण्याच्या फेऱ्या मारत होता. फिर्यादी कृष्णा यांनी त्याला हटकले आणि “तू आमच्या घरासमोर फेऱ्या मारू नको,” असे सांगितले. याच गोष्टीचा राग मनात धरून आरोपी शुभम याने फिर्यादींना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

 

वाद वाढल्यानंतर शुभमच्या मदतीला त्याचे इतर साथीदारही तिथे धावून आले. आरोपी दत्ता डोंबाळे आणि रामदास डोंबाळे यांनी फिर्यादीच्या घरासमोर येऊन जोरदार आरडाओरडा करत शिवीगाळ केली आणि कृष्णा डोंबाळे यांना पकडून हाताने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.

दरम्यान, त्याच वेळी आरोपी नवनाथ डोंबाळे याने लाकडी दांडके आणून कृष्णा डोंबाळे यांच्या डाव्या पायाच्या गुडघ्यावर आणि मांडीवर कडक प्रहार केले. या हल्ल्यात कृष्णा यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. कृष्णा डोंबाळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून यवत पोलिसांनी भरतगाव येथील खालील चार आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक थिकोळे करीत आहेत.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

चोरांवर पोलिसांची करडी नजर; शिक्रापूर येथे नवनियुक्त पोलीस निरीक्षकांच्या धडाकेबाज मोहिमेमुळे चोरट्यांचे धाबे दणाणले

Friday, 12 June 2026, 20:44

रात्री टॉवर बंद, सकाळी सुरू! जिओ कंपनीच्या संशयास्पद कारभाराने पारोडी ग्रामस्थ वैतागले; तोडगा निघाला नाही तर करणार आंदोलन

Friday, 12 June 2026, 20:33

गुटखा माफियांचा खेळ खल्लास! आता थेट ‘मकोका’अंतर्गत होणार कारवाई; तुकाराम मुंढेंचा दणका

Friday, 12 June 2026, 20:23

सोलापूर हादरले! शेअर मार्केटमध्ये नुकसान अन् पत्नी व मुलांची हत्या करून स्वतःही केली आत्महत्या

Friday, 12 June 2026, 19:41

केडगावमध्ये पूर्ववैमनस्यातून तरुणावर कोयता, रॉड अन् हॉकी स्टिकने हल्ला; तिघांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

Friday, 12 June 2026, 19:26

पुण्यात 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचा 27 वर्षीय तरुणासोबत बालविवाह; चाइल्ड हेल्पलाइनच्या सतर्कतेमुळे बालविवाहाचा पर्दाफाश, नऊ जणांवर गुन्हा दाखल

Friday, 12 June 2026, 18:04
Next Post

Big Breaking : अ‍ॅमनोरा मॉलमधील कॉल सेंटरवर पोलिसांचा मोठा छापा; ऑनलाइन गेमिंगद्वारे आर्थिक फसवणुकीचा संशय, 14 जण ताब्यात

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.