Tuesday, June 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचा 27 वर्षीय तरुणासोबत बालविवाह; चाइल्ड हेल्पलाइनच्या सतर्कतेमुळे बालविवाहाचा पर्दाफाश, नऊ जणांवर गुन्हा दाखल

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 12 June 2026, 18:04

पुणे, ता. १२ : पुण्यातील खराडी परिसरात अल्पवयीन मुलीचा विवाह लावून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, चाइल्ड हेल्पलाइन १०९८ कडून मिळालेल्या माहितीच्या आधारे महिला व बाल विकास विभागाने केलेल्या चौकशीत संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश झाला आहे. अवघ्या १४ वर्षे ५ महिने वयाच्या मुलीचा २७ वर्षीय तरुणासोबत विवाह झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर विवाहाला संमती देणाऱ्या आणि तो पार पाडण्यात सहभागी असलेल्या नऊ जणांविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कृष्णा माधव कांबळे,सुरज गणपत कांबळे, शांताबाई गणपत कांबळे, अमोल गणपत कांबळे, योगेश काकासाहेब टैंकाळे, रुक्मीणी मारुती कांबळे, मोनिका नरसिंग कांबळे, नरसिंग मारुती कांबळे व संजना मारुती कांबळे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी मुख्य सेविका गायत्री पंडितराव सूर्यवंशी (वय २७) यांनी खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गायत्री सूर्यवंशी या बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, पुणे शहर पूर्व येथे कार्यरत आहेत. त्या खराडी व चंदननगर परिसरातील ३१ अंगणवाड्यांच्या कामकाजाची जबाबदारी सांभाळतात. महिला व बाल विकास विभागाला चाइल्ड हेल्पलाइन १०९८ कडून एका अल्पवयीन मुलीच्या बालविवाहाची माहिती प्राप्त झाली होती. त्यानुसार ८ जून रोजी मुख्य सेविका, अंगणवाडी सेविका आणि चाइल्ड हेल्पलाइनच्या प्रतिनिधींनी संबंधित पत्त्यावर भेट दिली. मात्र, त्यावेळी मुलगी गावी गेल्याचे सांगण्यात आले.

 

त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा पथकाने तपासणी केली असता संबंधित मुलगी गळ्यात मंगळसूत्र घातलेल्या अवस्थेत आढळून आली. चौकशीदरम्यान तिने स्वतःचे नाव करिष्मा (बदललेले नाव) असल्याचे सांगितले. मुलीसोबत असलेल्या कृष्णा माधव कांबळे (वय २७) याने दोघांनी खराडी गावातील बुद्ध विहार येथे विवाह केल्याचे सांगितले. पथकाने लग्नाबाबत विचारणा केली असता विवाहाचे छायाचित्रेही दाखविण्यात आली.

पुढील चौकशीत मुलीचे आई-वडील लातूर जिल्ह्यात राहत असल्याचे समोर आले. तसेच मुलीच्या जन्मदाखल्यावरील जन्मतारीख १ जानेवारी २०१२ असल्याची माहिती पालकांनी दिली. आधार कार्ड आणि इतर कागदपत्रांवरून मुलगी अल्पवयीन असल्याची खात्री करण्यात आली.
तपासात या विवाहासाठी काही नातेवाईक आणि कुटुंबीयांची संमती असल्याचे निष्पन्न झाले. विवाहासाठी स्थळ सुचविणे, विवाहाच्या वेळी उपस्थित राहणे आणि संमती देणे या आरोपांवरून एकूण नऊ जणांविरुद्ध खराडी पोलीस ठाण्यात बालविवाह प्रतिबंधक अधिनियम, २००६ मधील कलम ९, १० आणि ११ अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणे ते शिर्डी नवी रेल्वे लवकरच होणार सुरु; बस-खाजगी वाहनांच्या कटकटीतून प्रवाशांची सुटका

Tuesday, 16 June 2026, 13:29

नीट फेरपरीक्षेसाठी केंद्र सरकार ‘ॲक्शन मोड’ मध्ये; पेपरफुटी रोखण्यासाठी टेलिग्रामवर बंदी

Tuesday, 16 June 2026, 13:16

राजगड पोलिसांचा ‘मिशन क्लीन’, अवैध धंद्यांविरोधात पीआय संतोष जाधव आक्रमक

Tuesday, 16 June 2026, 12:35

भोर-राजगडमधील ताडी विक्रीची सखोल चौकशी करा! अल्पवयीनाकडून झालेल्या खूनप्रकरणानंतर ताडी विक्री केंद्रांवर संयुक्त कारवाईची नागरिकांची मागणी

Tuesday, 16 June 2026, 12:29

राजगड पोलिसांचा धडाकेबाज ‘सपाटा’; नवीन पोलीस निरीक्षकांच्या पदभार स्वीकारताच मटका अड्ड्यावर कारवाईचा दणका

Tuesday, 16 June 2026, 12:23

सह्याद्री हॉस्पिटलचे फुफ्फुसरोग तज्ज्ञ डॉ. नाना कुंजीर यांच्यावर रुग्णाच्या मुलाकडून हल्ला

Tuesday, 16 June 2026, 12:14
Next Post

केडगावमध्ये पूर्ववैमनस्यातून तरुणावर कोयता, रॉड अन् हॉकी स्टिकने हल्ला; तिघांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.