Tuesday, June 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सह्याद्री हॉस्पिटलचे फुफ्फुसरोग तज्ज्ञ डॉ. नाना कुंजीर यांच्यावर रुग्णाच्या मुलाकडून हल्ला

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 16 June 2026, 12:14

हडपसर, ता. १६ : सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असलेल्या रुग्णाच्या प्रकृतीबाबत वाद घालत फुफ्फुसरोग तज्ज्ञ डॉक्टरला थप्पड मारून जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या मारहाणीत डॉक्टरांच्या चष्म्याची काच तुटली असून डोळ्यालाही दुखापत झाली आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी रुग्णाच्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

रवीराज नामदेव झुरंगे (वय ३०, रा. एकतपूर, ता. पुरंदर) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी सह्याद्री हॉस्पिटलमधील फुफ्फुसरोग तज्ज्ञ तथा वैद्यकीय अधिकारी डॉ. नाना गोकुळ कुंजीर (वय ४२) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नामदेव नारायण झुरंगे (वय ५४) यांना फुफ्फुसात पाणी साचल्याने ११ जून रोजी मध्यरात्री सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. डॉ. नाना कुंजीर यांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू होते. १२ जून रोजी दुपारी फुफ्फुसाच्या बाहेरील आवरणातील पाणी काढण्याची प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडण्यात आली. त्यानंतर रुग्णाची प्रकृती स्थिर असल्याने त्यांना अतिदक्षता विभागातून जनरल वॉर्डमध्ये हलविण्यात आले होते.

 

दरम्यान, सायंकाळी साडेपाचच्या सुमारास रुग्णाचा मुलगा रवीराज झुरंगे हा डॉक्टरांकडे आला. “माझ्या वडिलांवर योग्य उपचार झाले नाहीत,” असा आरोप करत त्याने डॉक्टरांशी वाद घालण्यास सुरुवात केली. डॉ. कुंजीर यांनी रुग्णाची प्रकृती स्थिर असून उपचार योग्य पद्धतीने सुरू असल्याचे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, संतप्त झालेल्या रवीराज झुरंगे याने डॉक्टरांच्या कानशिलात जोरदार थप्पड मारली. या मारहाणीत डॉ. कुंजीर यांच्या चष्म्याची काच तुटली तसेच डाव्या डोळ्याला दुखापत होऊन त्यांना काही काळ अंधुक दिसू लागले. हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप करून आरोपीला डॉक्टरांपासून दूर केले. त्यानंतर डॉक्टरांना प्राथमिक उपचार देण्यात आले.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी हॉस्पिटलमध्ये धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले. याप्रकरणी रवीराज झुरंगे याच्याविरुद्ध महाराष्ट्र वैद्यकीय सेवा व्यक्ती आणि वैद्यकीय सेवा संस्था (हिंसक कृत्ये व मालमत्तेची हानी प्रतिबंध) अधिनियम २०१० च्या कलम ४ तसेच भारतीय न्याय संहिता कलम ११५(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास हडपसर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप बिराजदार करीत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी सजली कदमवस्ती शाळा; शिक्षणोत्सवाने निर्माण केले नवचैतन्य

Tuesday, 16 June 2026, 14:13

भिवरी येथे जेवणाच्या वादावरून पत्नीच्या गळ्यावर चाकूने वार करून पती फरार

Tuesday, 16 June 2026, 14:09

अभिनेत्री संचिता उगलेच्या आत्महत्येने मनोरंजन विश्व हादरले; इंडस्ट्रीतील छळाला कंटाळून संपवले आयुष्य? मावशीने सांगितलं कारण

Tuesday, 16 June 2026, 13:40

पुणे ते शिर्डी नवी रेल्वे लवकरच होणार सुरु; बस-खाजगी वाहनांच्या कटकटीतून प्रवाशांची सुटका

Tuesday, 16 June 2026, 13:29

नीट फेरपरीक्षेसाठी केंद्र सरकार ‘ॲक्शन मोड’ मध्ये; पेपरफुटी रोखण्यासाठी टेलिग्रामवर बंदी

Tuesday, 16 June 2026, 13:16

राजगड पोलिसांचा ‘मिशन क्लीन’, अवैध धंद्यांविरोधात पीआय संतोष जाधव आक्रमक

Tuesday, 16 June 2026, 12:35
Next Post

राजगड पोलिसांचा धडाकेबाज 'सपाटा'; नवीन पोलीस निरीक्षकांच्या पदभार स्वीकारताच मटका अड्ड्यावर कारवाईचा दणका

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.