Friday, October 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

भिवरी येथे जेवणाच्या वादावरून पत्नीच्या गळ्यावर चाकूने वार करून पती फरार

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 16 June 2026, 14:09

सासवड, ता. १६ : किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट जीवघेण्या हल्ल्यात झाल्याची धक्कादायक घटना पुरंदर तालुक्यातील भिवरी येथे उघडकीस आली आहे. जेवण करण्यासाठी वारंवार सांगितल्याचा राग मनात धरून दारूच्या नशेत असलेल्या पतीने पत्नीला मारहाण करत तिच्या गळ्यावर चाकूने वार केल्याची घटना १४ जून रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. जखमी महिलेवर उपचार करण्यात आले असून आरोपी पती घटनास्थळावरून पसार झाला आहे.

याप्रकरणी कोमल नाना जगताप (वय १९, रा. भिवरी, ता. पुरंदर) यांनी सासवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती नाना विश्वास जगताप (वय २२) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोमल जगताप यांचा २०२४ मध्ये समाजाच्या रितीरिवाजाप्रमाणे विवाह झाला होता. पती नाना जगताप हा पारंपरिक पद्धतीने दारोदारी जाऊन देवाची आरती व गाणी म्हणण्याचा व्यवसाय करतो. त्याला दारूचे व्यसन असून किरकोळ कारणांवरून पत्नीशी वारंवार वाद घालण्याची सवय असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

नाना जगताप हा दारूच्या नशेत घरी आला होता. पत्नीने त्याला जेवण करण्यासाठी बोलावले आणि मोबाईल बाजूला ठेवून जेवण करण्यास सांगितले. याच कारणावरून त्याचा संताप अनावर झाला. त्याने पत्नीच्या कानशिलात थपडा मारत मारहाण केली. त्यानंतर घरात पडलेला चाकू उचलून तिच्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. स्वतःचा बचाव करत असताना झटापटीदरम्यान कोमल यांच्या गळ्याला चाकू लागून त्या जखमी झाल्या.

आरडाओरड ऐकून शेजारी राहणाऱ्या महिलांनी धाव घेत भांडण सोडवले. मात्र, त्यानंतरही आरोपीने पुन्हा पत्नीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. अखेर पीडित महिला घराबाहेर पडून शेजाऱ्यांच्या मोबाईलवरून आईला संपर्क साधला. त्यानंतर आई आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, त्यापूर्वीच आरोपी पती फरार झाला होता.

 

जखमी महिलेवर सासवड ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले असून सासवड पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पिकांना पाणी देण्याची धडपड; शेटफळगढेत कॅनलच्या पाण्यावरून शेतकरी-कंत्राटी कर्मचाऱ्यांत जोरदार वाद

Friday, 2 October 2026, 12:48

केक-कटिंगऐवजी आरोग्य शिबिर! माऊली आबांच्या वाढदिवशी 1600 हून अधिक नागरिकांची तपासणी

Friday, 2 October 2026, 12:37

Snapchat वर अनोळखी मेसेज, मग अश्लील फोटो अन् 19 वर्षीय तरुणीला थेट धमकी! शिरूर पोलिसांत अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 2 October 2026, 12:27

कोलवडीत जुन्या आर्थिक व्यवहाराच्या वादातून व्यवसायिक सचिन लोणकर यांच्यावर हल्ला; दोघांवर गुन्हा दाखल..

Friday, 2 October 2026, 12:26

आई घराबाहेर गेली अन् संधी साधली! लोहगावात साडेचार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; 20 वर्षीय तरुणाला अटक

Friday, 2 October 2026, 10:06

पोलिसांची टोपी घातली अन् ‘मी इथला’ म्हणत कॅब चालकाला धमकावलं; पुण्यात तोतया पोलिसाचा पर्दाफाश

Friday, 2 October 2026, 9:28
Next Post

विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी सजली कदमवस्ती शाळा; शिक्षणोत्सवाने निर्माण केले नवचैतन्य

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp