Saturday, June 20, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सेतू केंद्रावरून लोणी काळभोर विरुद्ध मांजरी बुद्रुक वाद; प्रशासकीय इमारतीनंतरच लोणीत केंद्र सुरू होणार – तृप्ती कोलते

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 16 June 2026, 15:05

लोणी काळभोर, ता. १६ : अपर तहसील कार्यालयाची स्वतंत्र प्रशासकीय इमारत उभारल्यानंतर लोणी काळभोर येथे सेतू सुविधा केंद्र सुरू करण्यात येणार असून, तोपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात मांजरी बुद्रुक येथील प्रशासकीय इमारतीत हे केंद्र कार्यरत राहणार आहे, अशी माहिती लोणी काळभोरच्या अपर तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी तृप्ती कोलते-पाटील यांनी दिली.

लोणी काळभोरचे प्रशासक नागेश काळभोर यांनी तहसील कार्यक्षेत्रासाठी मंजूर झालेल्या सेतू सुविधा केंद्राचे मांजरी बुद्रुक येथे स्थलांतर न करता ते लोणी काळभोर परिसरातच सुरू करण्याची मागणी प्रशासनाकडे केली होती. या पार्श्वभूमीवर अपर तहसीलदार तृप्ती कोलते यांनी प्रशासनाची भूमिका स्पष्ट केली.

तृप्ती कोलते यांनी सांगितले की, जिल्हाधिकारी कार्यालयाने २८ ऑक्टोबर २०२५ रोजी एका संस्थेची सेतू सुविधा केंद्रासाठी पुरवठादार म्हणून नियुक्ती केली आहे. मात्र, नव्याने सुरू झालेल्या अपर तहसील लोणी काळभोर कार्यालयाकडे स्वतःची प्रशासकीय इमारत नसल्याने आणि सध्या उपलब्ध जागा अपुरी असल्यामुळे नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी मांजरी बुद्रुक येथील शासकीय इमारतीमध्ये तात्पुरत्या स्वरूपात सेतू केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अपर तहसील कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील विविध गावांच्या तुलनेत मांजरी बुद्रुक येथून सर्वाधिक अर्ज प्राप्त होत असल्याने तेथे सेतू केंद्र सुरू करणे प्रशासनाच्या दृष्टीने अधिक सोयीचे आणि क्रमप्राप्त असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

 

लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीत सध्या पाच ‘आपले सरकार सेवा केंद्रे’ (महा-ई सेवा केंद्रे) सुरू आहेत. शासन निर्णयानुसार ग्रामीण भागातील प्रत्येक ग्रामपंचायतीला स्वतंत्र सेतू सुविधा केंद्र उपलब्ध करून देण्यासाठी वर्षभरापूर्वीच ग्रामपंचायतींना आयडी आणि पासवर्ड देण्यात आले होते. लोणी काळभोर ग्रामपंचायतीलाही ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. मात्र, सहा महिन्यांहून अधिक कालावधी उलटल्यानंतरही संबंधित केंद्र सुरू होऊ शकले नसल्याची बाब त्यांनी निदर्शनास आणून दिली. वास्तव परिस्थितीची दखल न घेता काही ठिकाणी अर्धवट माहितीच्या आधारे नागरिक आणि लोकप्रतिनिधींची दिशाभूल केली जात असून, प्रसारमाध्यमांमधून चुकीच्या बातम्या पसरवून प्रशासनाची बदनामी होत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, अपर तहसील कार्यालयाची स्वतंत्र प्रशासकीय इमारत उभारल्यानंतर लोणी काळभोर येथेच सेतू सुविधा केंद्र सुरू करण्यात येईल, असा पुनरुच्चार तृप्ती कोलते-पाटील यांनी केला. तोपर्यंत नागरिकांच्या सोयीचा विचार करून मांजरी बुद्रुक येथे हे केंद्र तात्पुरत्या स्वरूपात सुरू ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

“लोणी काळभोर ग्रामपंचायतीमध्ये सेतू सुविधा केंद्र सुरू करण्यासाठी आवश्यक जागा उपलब्ध आहे. मात्र, जिल्हा परिषदेकडून ग्रामपंचायतीला अधिकृतपणे आयडी आणि पासवर्ड प्राप्त झालेले नाहीत. काही माहिती केवळ एका व्हॉट्सॲप ग्रुपवर पाठविण्यात आली होती, मात्र ती प्रणाली सध्या कार्यरत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे लोणी काळभोर येथेच सेतू सुविधा केंद्र सुरू करण्यासाठी प्रशासनाने आवश्यक तांत्रिक बाबी तातडीने पूर्ण करून नागरिकांना स्थानिक पातळीवर ही सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी आमची मागणी आहे.”
-नागेश काळभोर (प्रशासक, लोणी काळभोर ग्रामपंचायत, ता. हवेली

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

नीट फेरपरीक्षेसाठी पुणे पोलीस सज्ज; 63 केंद्रांवर प्रत्येक ठिकाणी 20 पोलिसांचा तगडा बंदोबस्त

Saturday, 20 June 2026, 14:22

विवस्त्र करून मारहाण, शॉकचे चटके अन् अनुयायांसमोरच बलात्कार; पुण्यात भोंदूबाबाच्या आश्रमात तरुणीसोबत घडलं भयंकर

Saturday, 20 June 2026, 14:07

पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणी 20 वर्षांनंतर सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता

Saturday, 20 June 2026, 13:38
ai image

नोकरी सोडायला लावली, घरात कोंडले अन् निवृत्त एसीपी सासऱ्याने केली ‘शरीरसुखाची’ मागणी; कोंढव्यात विवाहितेचा छळ

Saturday, 20 June 2026, 13:29

पावसाची हुलकावणी अन् उष्णतेचा दाह! 23 जूननंतर पावसाची शक्यता

Saturday, 20 June 2026, 13:06

Daily Horoscope: कसा असेल आजचा दिवस? कोणत्या राशींना मिळणार यश, तर कोणाला हवी सावधगिरी? वाचा सविस्तर!

Saturday, 20 June 2026, 13:00
Next Post

"आता तू मुसलमान झाली" महिलेला रूमवर बोलावलं, गुंगीचं औषध दिलं, दबाव टाकून धर्म बदलला; पहा व्हायरल व्हिडीओ...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.