Sunday, July 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

राजगड पोलिसांचा ‘मिशन क्लीन’, अवैध धंद्यांविरोधात पीआय संतोष जाधव आक्रमक

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 16 June 2026, 12:35

विशाल शिंदे

राजगड: राजगड पोलीस ठाण्याचा कार्यभार नुकताच स्वीकारलेल्या पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या सात-आठ दिवसांत कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंदे पूर्णपणे बंद करण्यासाठी कठोर कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट केले. यासोबतच कंपनीतील कामगारांची पोलीस पडताळणी, भाडेकरूंची नोंद, युवकांमधील व्यसनाधीनतेवर नियंत्रण, पॉक्सो व सायबर गुन्ह्यांबाबत जनजागृती आणि गावोगावी सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्यावर विशेष भर दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पीआय संतोष जाधव म्हणाले की, राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोणत्याही प्रकारचे अवैध व्यवसाय सुरू असल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. गुटखा विक्री, पानमसाला, हातभट्टी दारू, गावठी दारू, मटका, जुगार, गांजा तसेच इतर बेकायदेशीर धंदे कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाहीत. अशा व्यवसायांविरोधात सातत्याने धडक कारवाया करून संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.

 

औद्योगिक कंपन्या, कारखाने आणि विविध आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या सर्व कामगारांची तसेच सिक्युरिटी गार्डसह इतर कर्मचाऱ्यांची माहिती संबंधितांनी राजगड पोलीस ठाण्यात देणे बंधनकारक राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रत्येक कर्मचाऱ्याची पोलीस पडताळणी करून त्याची नोंद ठेवणे आवश्यक असून याबाबतच्या आदेशांचे पालन न करणाऱ्यांवर भारतीय न्याय संहितेतील लागू तरतुदींनुसार तसेच कलम १८८ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशाराही त्यांनी दिला.

घरमालकांनी आपल्या घरात राहणाऱ्या भाडेकरूंची संपूर्ण माहिती, ओळखपत्रे आणि भाडेकराराची प्रत पोलीस ठाण्यात जमा करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. भाडेकरूंची योग्य नोंद ठेवल्यास गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर नियंत्रण ठेवणे सुलभ होईल, असे त्यांनी नमूद केले.

सध्याची तरुण पिढी विविध प्रकारच्या व्यसनांच्या आहारी जात असल्याबद्दल चिंता व्यक्त करत पीआय जाधव यांनी युवकांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी विशेष जनजागृती मोहीम राबवली जाणार असल्याचे सांगितले. युवकांनी निरोगी आणि सुदृढ जीवन जगावे यासाठी सामाजिक सहभागातून विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

महिला आणि बालकांच्या सुरक्षेसाठी पॉक्सो कायद्याबाबत तसेच वाढत्या सायबर गुन्ह्यांपासून नागरिकांना सावध करण्यासाठी गावोगावी जनजागृती कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. शाळा, महाविद्यालये आणि ग्रामपंचायत स्तरावर या विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी गावोगावी आणि महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यावर भर दिला जाणार आहे. ग्रामपंचायती आणि स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने ही यंत्रणा उभारली जाईल, असे त्यांनी सांगितले.

शाळांच्या परिसरातील टपऱ्यांवर गुटखा, पानमसाला आणि तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर विशेष कारवाई केली जाणार असून विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नाही. तसेच बुलेट किंवा इतर दुचाकींना बदललेले सायलेंसर बसवून कर्कश आवाज करणाऱ्या वाहनचालकांवरही विशेष मोहीम राबवून कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या कोणत्याही अवैध धंद्याची किंवा गुन्हेगारीची माहिती नागरिकांनी पोलिसांना द्यावी. माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव आणि ओळख पूर्णपणे गुप्त ठेवली जाईल. पोलिसांना नागरिकांचे सहकार्य मिळाल्यास परिसर गुन्हेगारीमुक्त करण्यासाठी अधिक प्रभावीपणे काम करता येईल, असा विश्वास व्यक्त करत पीआय संतोष जाधव यांनी सर्व नागरिकांनी पोलिसांच्या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुन्हा पावसाचा रौद्रावतार! 26 ते 31 जुलैदरम्यान महाराष्ट्राला मुसळधार पावसाचा तडाखा, ‘रेड अलर्ट’ जारी

Sunday, 26 July 2026, 7:34

रविवारचा सुवर्णयोग! ‘या’ 5 राशींवर सूर्यदेवाची विशेष कृपा; वाचा आजचे राशीभविष्य

Sunday, 26 July 2026, 7:19

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर मोठा निर्णय; प्रल्हाद जोशींकडे शिक्षण खात्याची अतिरिक्त जबाबदारी!

Saturday, 25 July 2026, 23:00

आरोग्यवारी मॅरेथॉनमुळे पुणे, जेजुरी आणि बारामती मार्गांवर २६ जुलैला वाहतुकीत बदल

Saturday, 25 July 2026, 22:36

देशाचे नवे शिक्षण मंत्री कोण? धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर दिल्लीत हालचाली, ‘ही ‘नावं चर्चेत

Saturday, 25 July 2026, 22:03

राजगडावर शुल्कवसुली सुरू; मात्र स्वच्छतेचा बोजवारा! वन विभाग व पुरातत्त्व विभागाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह

Saturday, 25 July 2026, 21:37
Next Post

नीट फेरपरीक्षेसाठी केंद्र सरकार 'ॲक्शन मोड' मध्ये; पेपरफुटी रोखण्यासाठी टेलिग्रामवर बंदी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.