Wednesday, September 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

राजगडावर शुल्कवसुली सुरू; मात्र स्वच्छतेचा बोजवारा! वन विभाग व पुरातत्त्व विभागाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 25 July 2026, 21:37

विशाल शिंदे

पुणे : स्वराज्याची पहिली राजधानी असलेल्या ऐतिहासिक राजगडावर सध्या अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले असून, प्रशासनाच्या कारभारावर शिवप्रेमींकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. गडावर येणाऱ्या पर्यटकांकडून स्वच्छतेच्या नावाखाली २० ते ३० रुपये प्रवेश शुल्क आकारले जाते. मात्र, या मोबदल्यात पर्यटकांना मूलभूत सुविधा आणि स्वच्छता मिळत नसल्याचे विदारक चित्र समोर आले आहे.

नुकतीच भोर येथील रहिवासी ॲड. रोहित चव्हाण यांनी गडाला भेट दिली असता, प्रवेशद्वारावर लहान मुलांमार्फत तिकिटांची वसुली केली जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याशिवाय, पुरातत्त्व विभागाने उभारलेल्या शौचालयांमध्ये प्लास्टिकच्या बाटल्या, कचरा आणि प्रचंड दुर्गंधी पसरली होती. ऐतिहासिक वास्तूची ही अवस्था पाहून ॲड. चव्हाण आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वतः पुढाकार घेत शौचालयांची साफसफाई केली.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, राजगडावरून दरमहा लाखो रुपयांचा महसूल गोळा केला जातो. परंतु, हा निधी नेमका जातो कुठे? नियमित साफसफाई, पिण्याचे पाणी आणि कचरा व्यवस्थापन यांसारख्या साध्या सुविधाही पर्यटकांना का मिळत नाहीत? असे अनेक सवाल आता उपस्थित केले जात आहेत. केवळ पैशांची वसुली करण्यावर भर देणाऱ्या वन विभाग आणि पुरातत्त्व विभागाने या निधीचा हिशोब जाहीर करावा, अशी मागणी जोर धरत आहे.

 

राजगड हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि वैभवाचा प्रतीक आहे. अशा ऐतिहासिक ठिकाणी अशी दुरवस्था असणे अत्यंत खेदजनक आहे. त्यामुळे संबंधित प्रशासकीय यंत्रणांनी या प्रकाराची तातडीने दखल घेऊन गडावर स्वच्छता व्यवस्था कायम ठेवावी, तसेच या निष्काळजीपणाला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी शिवभक्त व पर्यटकांकडून केली जात आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पृथ्वीराज कपूर हायस्कूल तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत प्रथम! जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी दिमाखात निवड

Wednesday, 30 September 2026, 19:34

सासरच्या त्रासाला कंटाळून पिंपळगाव येथे विवाहितेची आत्महत्या, पतीसह तिघांवर गुन्हा दाखल

Wednesday, 30 September 2026, 19:28

यवतमध्ये भरदिवसा महिलांची चैन स्नॅचिंग; बंद सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे नागरिक आक्रमक; सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

Wednesday, 30 September 2026, 19:10

पुणेकरांची प्रतीक्षा संपली! हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो अवघ्या १० दिवसांत प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज होणार

Wednesday, 30 September 2026, 18:57

स्पर्धा परीक्षार्थींसाठी मोठी बातमी! MPSCच्या सर्व परीक्षा आता ऑफलाईन; रिक्त पदंही भरणार

Wednesday, 30 September 2026, 18:49

दारू शौकिनांसाठी मोठी बातमी! ऑक्टोबरमध्ये ‘या’ दिवशी दारूविक्री बंद,,राज्य उत्पादन शुल्क विभागाचा मोठा निर्णय

Wednesday, 30 September 2026, 18:15
Next Post

देशाचे नवे शिक्षण मंत्री कोण? धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर दिल्लीत हालचाली, 'ही 'नावं चर्चेत

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp