Sunday, July 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

व्हाट्सअँप डीपीवर कंपनी संचालकाचा फोटो लावून 20 लाखांची फसवणूक; राजगड पोलिसांत गुन्हा दाखल

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 25 July 2026, 20:42

विशाल शिंदे

पुणे : भोर तालुक्यातील रांजे येथील एका खासगी कंपनीची तब्बल 20 लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. व्हॉट्सअॅपवरील डिस्प्ले फोटो (डीपी) म्हणून कंपनीच्या संचालकाचा फोटो वापरून एका अनोळखी व्यक्तीने कंपनीच्या कर्मचाऱ्यांची दिशाभूल करत ही फसवणूक केल्याप्रकरणी राजगड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 17 जुलै रोजी सकाळी 10 ते 11 वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. संबंधित अनोळखी व्यक्तीने एका व्हॉट्सअॅप क्रमांकावरून कंपनीच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला. व्हॉट्सअॅप डीपीवर कंपनीच्या संचालकाचा फोटो असल्याने कर्मचाऱ्यांचा विश्वास बसला.

 

यानंतर “कंपनीला नवीन पुरवठादार (सप्लायर) मिळाला असून त्याला तातडीने अॅडव्हान्स पेमेंट करायचे आहे,” असे सांगत संबंधित व्यक्तीने कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून 20 लाख रुपये हस्तांतरित करून घेतले. व्यवहार झाल्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आले.

या प्रकरणी कंपनीच्या प्रतिनिधीने तक्रार दाखल केली असून, सायबर झिरो एफआयआरद्वारे हे प्रकरण राजगड पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले. त्यानंतर राजगड पोलिसांनी अनोळखी आरोपीविरुद्ध आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

सायबर गुन्हेगारांकडून व्हॉट्सअॅप डीपीवर ओळखीच्या व्यक्तीचा फोटो वापरून कर्मचारी किंवा व्यावसायिकांची फसवणूक करण्याचे प्रकार वाढत आहेत. त्यामुळे कोणत्याही आर्थिक व्यवहारापूर्वी संबंधित व्यक्तीशी प्रत्यक्ष फोनवर किंवा इतर खात्रीशीर माध्यमातून संपर्क साधून पडताळणी करावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.या प्रकरणाचा पुढील तपास राजगड पोलीस करत आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

सोलापूर हादरले! रेल्वेसमोर उडी मारून आईसह १४ वर्षांच्या मुलीची आत्महत्या; परिसरात पसरली शोककळा

Sunday, 26 July 2026, 22:57

नीट पेपरफुटीनंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; परीक्षा व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी थेट ‘हाय-पावर टास्क फोर्स’ स्थापन!

Sunday, 26 July 2026, 22:30

शेतकऱ्यांनो सावधान! या ३ चुकांमुळे अडकू शकतो तुमचा २००० रुपयांचा हप्ता; वाचा सविस्तर माहिती

Sunday, 26 July 2026, 21:56

मी ‘रॉ’चा माणूस आहे म्हणत फसवलं! व्यापाऱ्याचे बँक खाते फ्रीज करून लाखांची खंडणी उकळणारा तोतया जेरबंद

Sunday, 26 July 2026, 21:10

माळशेज घाटात थरारक दुर्घटना! तब्बल १०० मीटर रस्ता ५ ते ६ फूट खाली खचला; वाहतूक पूर्णपणे बंद

Sunday, 26 July 2026, 20:16

बारामतीत अपघाताचा थरार! हादरली! भरधाव ट्रकच्या धडकेत सख्ख्या भावांपैकी एकाचा जागीच मृत्यू

Sunday, 26 July 2026, 19:54
Next Post

तांभाड येथे महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरमधील तांब्याच्या तारा चोरी; ट्रान्सफॉर्मरचेही नुकसान

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.