Saturday, July 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

राजगड पोलिसांचा धडाकेबाज ‘सपाटा’; नवीन पोलीस निरीक्षकांच्या पदभार स्वीकारताच मटका अड्ड्यावर कारवाईचा दणका

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 16 June 2026, 12:23

विशाल शिंदे 

राजगड: राजगड पोलीस ठाण्यात नुकतेच रुजू झालेले पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांनी पदभार स्वीकारताच बेकायदेशीर धंद्यांविरोधात धडक कारवाईचा सपाटा लावला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली राजगड पोलिसांनी मधुशाला बार शेजारी सुरू असलेल्या कथित मटका अड्ड्यावर छापा टाकून सहा जणांवर कारवाई केली. या कारवाईमुळे नसरापूर परिसरातील अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली असून, पोलिसांच्या या कारवाईचे नागरिकांकडून स्वागत केले जात आहे.

पोलीस पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सोमवारी रात्री मधुशाला बारच्या बाजूच्या मोकळ्या जागेवर छापा टाकण्यात आला. छाप्यावेळी काही व्यक्ती चिठ्ठ्यांवर आकडे घेऊन कथितपणे मटका जुगार चालवत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संबंधितांना ताब्यात घेतले.

 

या कारवाईत गणेश रघुनाथ जाधव (वय ५२, रा. केळवडे), अनिल एकनाथ भिलारे (वय ५३, रा. नसरापूर), रमेश हरिशचंद्र नाईक (वय ४५, रा. सह्याद्री सिटी, नसरापूर), शिवलिंग मलया गुत्तेदार (वय ५०, रा. सुपरमार्केट शेजारी, नसरापूर), जावेद बादशाह मुलाणी (वय २७, रा. नसरापूर) आणि प्रदीप शंकर धुमाळ (वय ४२, रा. केळवडे) यांच्यावर कारवाई करण्यात आली.

छाप्यामध्ये रोख ४ हजार २३० रुपये, मटका व्यवहारासाठी वापरले जाणारे दोन पावती पुस्तके, कार्बन पेपर आणि बॉलपेन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून जप्त केलेले साहित्य ताब्यात घेतले असून संबंधितांविरुद्ध पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांनी नुकताच राजगड पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला असून, रुजू झाल्यानंतर अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याचा स्पष्ट संदेश दिला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली अल्पावधीत झालेल्या या कारवाईची संपूर्ण भोर तालुक्यात चर्चा सुरू झाली आहे. मटका, जुगार, गुटखा, हातभट्टी दारू आणि इतर बेकायदेशीर व्यवसायांवरही अशाच पद्धतीने सातत्याने कारवाई व्हावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

राजगड पोलीस ठाण्याच्या पथकाने केलेल्या या कारवाईमुळे बेकायदेशीर धंदे चालविणाऱ्यांचे धाबे दणाणले असून, पुढील काळात अशा कारवाया आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास राजगड पोलीस करीत आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

नीट पेपरफुटीपाठोपाठ शिक्षणात आणखी एक महाघोटाळा! १९० कोटींच्या बनावट ‘शालार्थ आयडी’ प्रकरणी माजी शिक्षणाधिकाऱ्यांना अटक

Friday, 24 July 2026, 22:58

सोशल मीडियाची मैत्री पडली महागात! शिक्षिकेच्या घरातून १४ लाखांचा ऐवज लांबवून प्रियकर पसार

Friday, 24 July 2026, 22:23

पावसाचा जोर ओसरणार की संकट कायम? राज्यात ३ ठिकाणी ‘ऑरेंज’ तर ७ जिल्ह्यांत ‘यलो’ अलर्ट जारी!

Friday, 24 July 2026, 21:43

पेपरफुटी करणाऱ्यांना आता १० वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा अन् १० कोटींचा दंड! कॅबिनेटचा सर्वात मोठा निर्णय

Friday, 24 July 2026, 21:02

शिरूरमधील प्रकार! खरेदीच्या बहाण्याने सराफ दुकानात शिरल्या अन् चार महिलांनी हातचलाखीने दागिने लांबवीले….

Friday, 24 July 2026, 20:19

पत्नीचे उत्पन्न जास्त असेल तर पोटगीचा अधिकार नाही! मुंबई उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक आणि मोठा निर्णय

Friday, 24 July 2026, 19:36
Next Post

भोर-राजगडमधील ताडी विक्रीची सखोल चौकशी करा! अल्पवयीनाकडून झालेल्या खूनप्रकरणानंतर ताडी विक्री केंद्रांवर संयुक्त कारवाईची नागरिकांची मागणी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.