Thursday, October 15, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शिरूरमधील प्रकार! खरेदीच्या बहाण्याने सराफ दुकानात शिरल्या अन् चार महिलांनी हातचलाखीने दागिने लांबवीले….

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 24 July 2026, 20:19

पुणे: पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील रांजणगाव गणपती येथे एका सराफा दुकानात चार महिलांनी खरेदीच्या बहाण्याने प्रवेश करून चांदीचे दागिने चोरल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे, महिलांनी इतक्या शिताफीने ही चोरी केली की त्या दुकानातून निघून गेल्यानंतरच दुकानदाराच्या हा प्रकार लक्षात आला. संपूर्ण घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, पोलिसांनी अज्ञात महिलांचा शोध सुरू केला आहे.

रांजणगाव गणपती येथील महावीर ज्वेलर्स या दुकानात २३ जुलै रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास चार महिला ग्राहक म्हणून आल्या. त्यांनी चांदीच्या जोडव्यांची मागणी करत विविध दागिने पाहण्यास सुरुवात केली. बराच वेळ दागिने पाहिल्यानंतर त्यांनी कोणतीही खरेदी न करता दुकानातून बाहेर पडल्या.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलांच्या येण्यापूर्वी आणखी एक महिला दुकानात उपस्थित होती. दुकानातील गर्दी आणि दागिने पाहण्याच्या गडबडीत आरोपी महिलांनी हातचलाखी करत प्लास्टिकच्या पिशवीत ठेवलेले चांदीचे जोडवे लांबवल्याचा संशय आहे. महिलांच्या हालचालींमुळे त्या वेळी दुकानदाराला कोणताही संशय आला नव्हता.

काही वेळानंतर दुकानातील मालाची तपासणी करताना दुकानदार प्रणय वर्मा यांच्या लक्षात आले की, प्लास्टिकच्या पिशवीत ठेवलेले तब्बल ८२ चांदीचे जोडवे गायब आहेत. त्यानंतर त्यांनी दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता चोरीचा प्रकार उघडकीस आला. यानंतर त्यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

 

तक्रारीनुसार पोलिसांनी चार अज्ञात महिलांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपी महिलांची ओळख पटविण्याचे काम सुरू असून, त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. या घटनेमुळे परिसरातील सराफा व्यावसायिकांमध्ये चिंता व्यक्त होत असून, दुकानांमध्ये सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्याची गरजही अधोरेखित झाली आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुणे-पिंपरीत रॅपिडो बाइक टॅक्सीवरून वाद पेटला ! सेवा बंद करण्याचे आदेश; नेमकं कारण काय?

Thursday, 15 October 2026, 18:36

लाडक्या बहिणी थेट देवभाऊंच्या बंगल्यावर धडकणार? योजनेचे १५०० रुपये बंद झाल्याने आंदोलनाचा इशारा; नेमकं प्रकरण काय?

Thursday, 15 October 2026, 18:23

MPSC चौकशी आयोगाच्या सचिवपदावरून तुकाराम मुंढेंचा मोठा खुलासा! नेमकं काय घडलं?

Thursday, 15 October 2026, 18:20

ओव्हरलोडचे हप्ते घेऊनही आरटीओ कडून कारवाई – वाहनमालक संजय कांगणे यांचा गंभीर आरोप

Thursday, 15 October 2026, 17:54

पूर्व हवेलीत मुळा-मुठा कालवा दुथडी भरून, पण विजेअभावी पिके चालली सुकून! शेतकरी हवालदिल

Thursday, 15 October 2026, 17:44

पीडीसीसी बँकेच्या निवडणुकीचे बिगुल; प्रारूप मतदार यादी आज प्रसिद्ध, राजकीय हालचालींना वेग

Thursday, 15 October 2026, 17:38
Next Post

पेपरफुटी करणाऱ्यांना आता १० वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा अन् १० कोटींचा दंड! कॅबिनेटचा सर्वात मोठा निर्णय

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp