Friday, July 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

नीट पेपरफुटीपाठोपाठ शिक्षणात आणखी एक महाघोटाळा! १९० कोटींच्या बनावट ‘शालार्थ आयडी’ प्रकरणी माजी शिक्षणाधिकाऱ्यांना अटक

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 24 July 2026, 22:58

धुळे: देशभरात नीट (NEET) पेपरफुटी आणि शिक्षण व्यवस्थेतील अनियमिततांवरून चर्चा सुरू असतानाच महाराष्ट्रातील शिक्षण विभागातील आणखी एका मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचे प्रकरण समोर आले आहे. बनावट शालार्थ आयडी तयार करून शासनाची तब्बल १९० कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी नाशिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत भाऊराव हिंगणीकर (वय ६६) यांना धुळे येथून अटक केली आहे. या कारवाईमुळे शिक्षण विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता, २०२३ तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांतील ४५९ शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नावाने बनावट शालार्थ आयडी तयार करण्यात आले. या बनावट आयडींच्या माध्यमातून वेतन आणि थकबाकीची रक्कम काढून शासनाची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप आहे.

पोलिसांच्या तपासानुसार, शशिकांत हिंगणीकर हे जळगाव जिल्हा परिषदेत माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत असताना कोणताही वैध प्रशासकीय प्रस्ताव नसताना बनावट वैयक्तिक मान्यता दिल्याचा आरोप आहे. या मान्यतेच्या आधारे बनावट शालार्थ आयडी तयार करून आर्थिक व्यवहार करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.

 

या संपूर्ण घोटाळ्यात आतापर्यंत सुमारे १,२०० जणांचा सहभाग असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून आणखी काही अधिकारी, कर्मचारी किंवा संबंधित व्यक्तींची भूमिका तपासली जात आहे.

गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी धुळे येथे सापळा रचून शशिकांत हिंगणीकर यांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना नाशिक येथे आणून औपचारिक अटक करण्यात आली.

दरम्यान, या कोट्यवधी रुपयांच्या कथित घोटाळ्यामुळे शिक्षण विभागाच्या कामकाजावर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. नाशिक शहर गुन्हे शाखेकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, गैरव्यवहाराची व्याप्ती आणि संबंधितांची जबाबदारी निश्चित करण्याचे काम सुरू आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

नीट पेपरफुटीपाठोपाठ शिक्षणात आणखी एक महाघोटाळा! १९० कोटींच्या बनावट ‘शालार्थ आयडी’ प्रकरणी माजी शिक्षणाधिकाऱ्यांना अटक

Friday, 24 July 2026, 22:58

सोशल मीडियाची मैत्री पडली महागात! शिक्षिकेच्या घरातून १४ लाखांचा ऐवज लांबवून प्रियकर पसार

Friday, 24 July 2026, 22:23

पावसाचा जोर ओसरणार की संकट कायम? राज्यात ३ ठिकाणी ‘ऑरेंज’ तर ७ जिल्ह्यांत ‘यलो’ अलर्ट जारी!

Friday, 24 July 2026, 21:43

पेपरफुटी करणाऱ्यांना आता १० वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा अन् १० कोटींचा दंड! कॅबिनेटचा सर्वात मोठा निर्णय

Friday, 24 July 2026, 21:02

शिरूरमधील प्रकार! खरेदीच्या बहाण्याने सराफ दुकानात शिरल्या अन् चार महिलांनी हातचलाखीने दागिने लांबवीले….

Friday, 24 July 2026, 20:19

पत्नीचे उत्पन्न जास्त असेल तर पोटगीचा अधिकार नाही! मुंबई उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक आणि मोठा निर्णय

Friday, 24 July 2026, 19:36
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.