Tuesday, September 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सोशल मीडियाची मैत्री पडली महागात! शिक्षिकेच्या घरातून १४ लाखांचा ऐवज लांबवून प्रियकर पसार

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 24 July 2026, 22:23

पुणे: सोशल मीडियावर झालेली मैत्री एका शिक्षिकेसाठी मोठी फसवणूक ठरली. मैत्रिणीला भेटण्यासाठी तिच्या घरी आलेल्या तरुणाने संधी साधत रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा तब्बल १४ लाख ६३ हजार ४९६ रुपयांचा ऐवज चोरून पलायन केले. मात्र, कोंढवा पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे गुजरातमधील वडोदरा येथून आरोपीला अटक करत चोरीतील बहुतांश मुद्देमाल जप्त केला.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव यश कैलास भुलचंदानी (वय २४, रा. मोहाडी, जि. म्हैसाणा, गुजरात) असे आहे. पोलिसांनी त्याच्याकडून सुमारे १४ लाख ३९ हजार रुपये किमतीचे १६ तोळे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी पुण्यात शिक्षिका असून अविवाहित आहे. सुमारे दीड ते दोन वर्षांपूर्वी तिची सोशल मीडियाच्या माध्यमातून यशशी ओळख झाली होती. एमबीए शिक्षण घेतलेल्या यशने यापूर्वी केनियामध्ये नोकरी केली होती. काही दिवसांपूर्वी तो पुण्यात आला होता आणि एका टुरिस्ट कंपनीत काम करत होता.

२५ जून रोजी यश हा शिक्षिकेला भेटण्यासाठी कोंढवा खुर्द येथील तिच्या घरी गेला होता. त्यावेळी शिक्षिका जवळच राहणाऱ्या आपल्या मावशीकडे जेवणाचा डबा देण्यासाठी गेली होती. घरात कोणी नसल्याची संधी साधून आरोपीने बेडरूममधील कपाटातून २४ हजार रुपयांची रोकड आणि सोन्याचे दागिने चोरले. घरातून निघताना “माझी तब्येत ठीक नाही, त्यामुळे मी निघतो,” असे सांगून त्याने तेथून काढता पाय घेतला.

 

घरी परतल्यानंतर चोरी झाल्याचे लक्षात येताच शिक्षिकेने कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तपासादरम्यान आरोपी शिक्षिकेशी केवळ स्नॅपचॅटद्वारे संपर्कात असल्याचे समोर आले. त्याचा मोबाईल क्रमांकही उपलब्ध नव्हता. अशा परिस्थितीत पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने आरोपीचा माग काढला. तपासादरम्यान पोलीस कर्मचारी केशव हिरवे यांना आरोपी वडोदरा येथे असल्याची माहिती मिळाली.

कोंढवा पोलिसांच्या पथकाने चार दिवस आरोपीवर पाळत ठेवली. पासपोर्टसंबंधी कामासाठी तो वडोदरा येथे आला असताना त्याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने चोरीची कबुली दिली. या कारवाईत पोलिसांनी चोरीतील बहुतांश सोन्याचे दागिने जप्त केले असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

दर्शनाहून परताना काळाचा घाला! नांदेडच्या तोटंबा घाटात कमांडर जीप झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघातात ४ जण जागीच ठार

Monday, 31 August 2026, 23:24

RBI आणि दिग्गजांचे सर्व अंदाज फोल ठरले! भारताच्या आर्थिक वाढीने अपेक्षेपेक्षाही गाठली उच्च पातळी

Monday, 31 August 2026, 23:09

सणासुदीच्या काळात सामान्यांना मोठा दिलासा! साखरेच्या कारखान्यातील दरात थेट ३० टक्क्यांची घसरण

Monday, 31 August 2026, 22:48

मालाडमध्ये भरधाव कारने तब्बल २० जणांना उडवले! महिलेचा जागीच मृत्यू; अपघातग्रस्तांचा आक्रोश, तर आरोपीला पोलिसांत व्हीआयपी ट्रिटमेंट?

Monday, 31 August 2026, 21:39

200 वर्षांनंतर घरात चिमुकलीचा जन्म? रथातून मिरवणूक काढून लेकीचे दणक्यात स्वागत!

Monday, 31 August 2026, 20:53

अमित ठाकरेंनी काढला पंतप्रधान मोदींचा फोटो; पुण्यातील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये मोठा राडा, २५ जणांवर गुन्हा दाखल

Monday, 31 August 2026, 20:20
Next Post

नीट पेपरफुटीपाठोपाठ शिक्षणात आणखी एक महाघोटाळा! १९० कोटींच्या बनावट 'शालार्थ आयडी' प्रकरणी माजी शिक्षणाधिकाऱ्यांना अटक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp