Friday, June 12, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

गुटखा माफियांचा खेळ खल्लास! आता थेट ‘मकोका’अंतर्गत होणार कारवाई; तुकाराम मुंढेंचा दणका

Shreya Varkeby Shreya Varke
Friday, 12 June 2026, 20:23

मुंबई: गुटखा आणि तंबाखू सारख्या अवैध पदार्थांची व्यापार करणाऱ्या संघटित टोळ्यांवर ‘महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम’ (मकोका) अंतर्गत कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. गुटखा आणि निकोटीनयुक्त तंबाखू सारख्या प्रतिबंधित पदार्थांची विक्री करणाऱ्या रॅकेट्सना मोडीत काढण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे.

राज्यात गुटखाबंदी असतानाही काही मंडळी पैशांच्या लालसेपोटी  बेकायदेशीर रित्या याची विक्री करत आहेत. यामध्ये केवळ किरकोळ विक्रेतेच नव्हे, तर माल पुरवणारे, वाहतूक करणारे, गोदामाचे चालक आणि बडे उत्पादक अशा सर्वांचाच सहभाग असल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, आयुक्त तुकाराम मुंढे यांनी घेतलेल्या निर्णयानुसार, आता यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे.

नव्या आदेशानुसार, FDA च्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांना प्रत्येक कारवाईमध्ये ‘मकोका’ लावला जाऊ शकतो का, याची तपासणी करण्यात येणार आहे. दरम्यान, ज्यांच्यावर मागील 10 वर्षांच्या काळात एकापेक्षा जास्त गुन्हे नोंदवले  आहेत आणि ज्या गुन्ह्यांमध्ये 3 वर्षांहून अधिक शिक्षेची तरतूद आहे, अशा आरोपींना आता या कठोर कायद्याचा सामना करावा लागेल. या गुन्हेगारी सिंडिकेटचा पूर्णपणे पर्दाफाश करून त्यातील मुख्य सूत्रधारांना जेरबंद करणे हा प्रशासनाचा मुख्य हेतू आहे. छोट्या विक्रेत्यांवर कारवाई करण्याऐवजी संपूर्ण नेटवर्कवर कारवाई करण्यावर भर देण्यात येणार आहे.

 

या मोहिमेत पारदर्शकता आणि सातत्य राहावे यासाठी प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत, ज्याचा दरमहा आढावा घेतला जाईल. मकोका लागल्यास आरोपींना जामीन मिळणे कठीण होणार आहे. मात्र, या कारवाईत प्रामाणिक व्यावसायिकांना कसलाही त्रास होणार नाही, याची विशेष दक्षता घेतली जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

सार्वजनिक आरोग्याशी खेळणाऱ्या आणि बेकायदेशीर धंद्यातून माया गोळा करणाऱ्यांविरुद्ध प्रशासन आता पूर्ण तयारीनिशी कारवाई करणार आहे. आपल्या भागात प्रतिबंधित पदार्थांची विक्री किंवा साठवणूक होत असेल, तर नागरिक त्वरित तक्रार नोंदवून सहकार्य करू शकतात, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

चोरांवर पोलिसांची करडी नजर; शिक्रापूर येथे नवनियुक्त पोलीस निरीक्षकांच्या धडाकेबाज मोहिमेमुळे चोरट्यांचे धाबे दणाणले

Friday, 12 June 2026, 20:44

रात्री टॉवर बंद, सकाळी सुरू! जिओ कंपनीच्या संशयास्पद कारभाराने पारोडी ग्रामस्थ वैतागले; तोडगा निघाला नाही तर करणार आंदोलन

Friday, 12 June 2026, 20:33

गुटखा माफियांचा खेळ खल्लास! आता थेट ‘मकोका’अंतर्गत होणार कारवाई; तुकाराम मुंढेंचा दणका

Friday, 12 June 2026, 20:23

सोलापूर हादरले! शेअर मार्केटमध्ये नुकसान अन् पत्नी व मुलांची हत्या करून स्वतःही केली आत्महत्या

Friday, 12 June 2026, 19:41

केडगावमध्ये पूर्ववैमनस्यातून तरुणावर कोयता, रॉड अन् हॉकी स्टिकने हल्ला; तिघांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

Friday, 12 June 2026, 19:26

पुण्यात 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचा 27 वर्षीय तरुणासोबत बालविवाह; चाइल्ड हेल्पलाइनच्या सतर्कतेमुळे बालविवाहाचा पर्दाफाश, नऊ जणांवर गुन्हा दाखल

Friday, 12 June 2026, 18:04
Next Post

रात्री टॉवर बंद, सकाळी सुरू! जिओ कंपनीच्या संशयास्पद कारभाराने पारोडी ग्रामस्थ वैतागले; तोडगा निघाला नाही तर करणार आंदोलन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.