Saturday, June 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Big Breaking : अ‍ॅमनोरा मॉलमधील कॉल सेंटरवर पोलिसांचा मोठा छापा; ऑनलाइन गेमिंगद्वारे आर्थिक फसवणुकीचा संशय, 14 जण ताब्यात

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 11 June 2026, 13:11

पुणे, ता. ११ : हडपसर येथील अ‍ॅमनोरा मॉलमधील एका खासगी कार्यालयावर पुणे पोलिसांनी बुधवारी (ता. ११) दुपारी मोठी छापेमारी कारवाई केली. ऑनलाइन गेमिंग अॅपच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक केल्याच्या संशयावरून तब्बल १४ जणांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईमुळे सायबर गुन्हेगारीच्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, हडपसरमधील अ‍ॅमनोरा मॉल परिसरात एका कॉल सेंटरच्या माध्यमातून अवैध ऑनलाइन गेमिंग अॅप चालवून नागरिकांची आर्थिक फसवणूक केली जात आहे. या माहितीच्या आधारे पोलीस उपआयुक्त जीवन बेनिवाल यांच्या आदेशानुसार विशेष पथकाची स्थापना करण्यात आली.

मुंढवा, लोणी काळभोर, मांजरी तसेच सायबर पोलिसांच्या संयुक्त पथकाने चार सेक्टरमध्ये नियोजन करून छापेमारी केली. फॉरेन्सिक आणि सायबर तज्ज्ञांनाही या कारवाईत सहभागी करण्यात आले होते. पोलिसांनी अ‍ॅमनोरा मॉलमधील ‘अॅपेक्स अॅचीव्हर एलएलपी’ या कार्यालयावर धाड टाकत तेथील कामकाजाची पाहणी केली आणि उपस्थित कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू केली.

 

कारवाईदरम्यान कार्यालयातील संगणक, लॅपटॉप, हार्डडिस्क, सर्व्हर, इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि महत्त्वाची कागदपत्रे तपासण्यात आली. प्राथमिक तपासात ऑनलाइन गेमिंग अॅपच्या माध्यमातून संशयास्पद आर्थिक व्यवहार होत असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी १४ जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे.

विशेष म्हणजे, बुधवारी दुपारपासून सुरू झालेली ही कारवाई गुरुवारी मध्यरात्रीपर्यंत सुरू होती. हडपसरमधील अ‍ॅमनोरा मॉलसह फुरसुंगी येथील इन्फोसिटीमधील आणखी एका कॉल सेंटरवरही पोलिसांनी एकाचवेळी छापेमारी केल्याची माहिती समोर आली आहे. या दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

सूत्रांच्या माहितीनुसार, पुणे पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ-६ आणि सायबर पोलिसांच्या संयुक्त पथकातील २०० हून अधिक पोलीस अधिकारी व कर्मचारी या कारवाईत सहभागी झाले होते. पोलिसांनी दोन्ही कॉल सेंटर्सना चारही बाजूंनी वेढा घालत तपास सुरू केला. तब्बल १० ते १२ तास सुरू असलेल्या या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली.

दरम्यान, जप्त करण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांची सायबर आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांकडून तपासणी केली जात आहे. या रॅकेटचा नेमका आवाका, आर्थिक उलाढाल, परदेशी कनेक्शन आहे का आणि किती नागरिकांची फसवणूक झाली आहे, याचा तपास सध्या सुरू आहे. या कारवाईमुळे पुणे शहरातील सायबर फसवणूक आणि अवैध ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यावर मोठा आघात झाल्याचे मानले जात आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

चोरांवर पोलिसांची करडी नजर; शिक्रापूर येथे नवनियुक्त पोलीस निरीक्षकांच्या धडाकेबाज मोहिमेमुळे चोरट्यांचे धाबे दणाणले

Friday, 12 June 2026, 20:44

रात्री टॉवर बंद, सकाळी सुरू! जिओ कंपनीच्या संशयास्पद कारभाराने पारोडी ग्रामस्थ वैतागले; तोडगा निघाला नाही तर करणार आंदोलन

Friday, 12 June 2026, 20:33

गुटखा माफियांचा खेळ खल्लास! आता थेट ‘मकोका’अंतर्गत होणार कारवाई; तुकाराम मुंढेंचा दणका

Friday, 12 June 2026, 20:23

सोलापूर हादरले! शेअर मार्केटमध्ये नुकसान अन् पत्नी व मुलांची हत्या करून स्वतःही केली आत्महत्या

Friday, 12 June 2026, 19:41

केडगावमध्ये पूर्ववैमनस्यातून तरुणावर कोयता, रॉड अन् हॉकी स्टिकने हल्ला; तिघांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

Friday, 12 June 2026, 19:26

पुण्यात 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचा 27 वर्षीय तरुणासोबत बालविवाह; चाइल्ड हेल्पलाइनच्या सतर्कतेमुळे बालविवाहाचा पर्दाफाश, नऊ जणांवर गुन्हा दाखल

Friday, 12 June 2026, 18:04
Next Post

रात्रीची वेळ, शस्त्राचा धाक अन् डिलिव्हरी बॉयला लुटले; बिबवेवाडीतील घटनेने पुण्यात खळबळ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.