Monday, September 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पिंपरी सांडस येथे भीमा नदीच्या 25 फूट उंच पुलावरून महिलेची उडी; धानोरे येथील शेतकरी तरुणामुळे टळला मोठा अनर्थ..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Monday, 7 September 2026, 15:48

उरुळी कांचन, (पुणे) : भीमा नदीच्या पात्रात 25 फूट उंचावरून उडी मारून जीवन संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका 35 वर्षीय महिलेला एका स्थानिक धाडसी युवकाने वेळेवर नदीत उडी मारून सुखरूप बाहेर काढले. या तरुणाच्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला असून, जखमी महिलेला तातडीने अष्टपूर फाट्यावरील श्री सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे.

सोनम सूर्यकांत महामुनी (वय 35, रा. दोरगे वस्ती, यवत, ता. दौंड) असे नदीत उडी मारलेल्या महिलेचे नाव असून, त्या तळेगाव ढमढेरे येथील एका कार्यालयात रिसेप्शनिस्ट म्हणून काम करतात. सदर महिला मानसिक तणावात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी सांडस (ता. हवेली) येथील भीमा नदीच्या पुलावरून सोनम महामुनी यांनी अचानक नदीपात्रात 25 फूट उंचावरून उडी मारली. त्याच वेळी जवळच राहणारा शेतकरी तरुण अनिल लक्ष्मण राठोड (वय 25, रा. धानोरे, ता. हवेली, जि. पुणे) हा शेतातील विजेची मोटर सुरू करण्यासाठी नदीकाठी गेला होता.

महिलेने नदीत उडी मारल्याचे प्रत्यक्ष पाहताच, अनिलने स्वतःच्या जिवाची कोणतीही पर्वा न करता क्षणाचाही विलंब न लावता नदीत उडी घेतली. पाण्याचा अंदाज घेत अत्यंत धाडसाने त्याने बुडणाऱ्या महिलेला ओढत नदीकाठी आणले आणि त्यांचे प्राण वाचवले. 25 वर्षीय अनिल राठोड याच्या या प्रसंगावधानाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 

25 फूट एवढ्या उंचावरून पडल्यामुळे पाण्याच्या वेगामुळे महिलेच्या पायाला अत्यंत गंभीर दुखापत झाली आहे. त्यांचा पाय तीन ठिकाणी फॅक्चर झाला असून मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव सुरू होता. घटनेची माहिती मिळताच लोणीकंद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास लोंढे यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला.

अतिशय गंभीर आणि रक्ताच्या थारोळ्यात असलेल्या महिलेला तातडीने अष्टपूर फाटा येथील श्री सिद्धिविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. अत्यावश्यक रुग्णवाहिका सेवा आणि तत्पर वैद्यकीय पथकामुळे रुग्णावर तातडीने आपत्कालीन उपचार सुरू करण्यात आले.

दरम्यान, ऐनवेळी उपलब्ध झालेल्या रुग्णवाहिकेमुळे आणि ग्रामीण भागात अष्टापूर फाट्यावर सुरु झालेल्या सिद्धिविनायक हॉस्पिटलच्या 24 तास सुरू असणाऱ्या इमर्जन्सी सेवेमुळे वेळेवर उपचार मिळून महिलेचे प्राण वाचण्यास मदत झाली. हे रुग्णालय परिसरातील आपत्कालीन रुग्णांसाठी पुन्हा एकदा वरदान ठरू लागले आहे. सध्या महिलेवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून लोणीकंद पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

मृत्यू दाखला काढण्याचे नियम बदलले! १ ऑक्टोबरपासून डेथ सर्टिफिकेट मिळवणे होणार अत्यंत कडक

Monday, 28 September 2026, 22:58

दिवाळी-छठसाठी पुणे रेल्वे विभागाचा मोठा निर्णय; २१६ विशेष फेऱ्या सुरू

Monday, 28 September 2026, 22:27

वर्षानुवर्षे रखडलेला बाणेर-पाषाण लिंक रोड आता पूर्णत्वास येणार; वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्याची चिन्हे

Monday, 28 September 2026, 21:50

साडेसतरानळीत पोलिसांच्या वाहनांसारख्या गाड्यांचा वापर? पुनावाला ग्रुपच्या सुरक्षा रक्षकांवर गंभीर आरोप; अमोल नाना तुपे यांच्याकडून चौकशीची मागणी

Monday, 28 September 2026, 20:56

‘झोपडपट्टींत राहून मुलांचं वळण बिघडलं’ मोठ्या भावाने वेगळं राहण्याची भाषा करताच लहाण्याचं डोकं फिरलं; भावाच्याच पोटात चाकूने वार केला अन्…

Monday, 28 September 2026, 20:15

सुनेत्रा पवारांसमोरच माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या सभेत राडा! सभासद आणि व्यवस्थापनात बाचाबाची; तणावामुळे बैठकीत गोंधळ

Monday, 28 September 2026, 19:37
Next Post

पुण्यात प्रसिद्ध लावणी नृत्यांगना राधा पाटीलवर गुन्हा दाखल! दहीहंडीतील लावणी कार्यक्रम भोवला; राधा पाटीलसह आयोजकांवर कारवाई

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp