Tuesday, September 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात प्रसिद्ध लावणी नृत्यांगना राधा पाटीलवर गुन्हा दाखल! दहीहंडीतील लावणी कार्यक्रम भोवला; राधा पाटीलसह आयोजकांवर कारवाई

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 7 September 2026, 15:55

पुणे : दहीहंडी कार्यक्रमासाठी पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही लावणीचा कार्यक्रम आयोजित केल्याप्रकरणी प्रसिद्ध लावणी नृत्यांगणा राधा पाटील यांच्यासह मंडळाचे अध्यक्ष आणि आयोजकाविरुद्ध बिबवेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कार्यक्रमात अश्लील नृत्य सादर होऊ नये, यासाठी कलाकारांनी रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे आवश्यक प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक करण्यात आले होते. मात्र, संबंधितांकडून आवश्यक कागदपत्रे सादर करण्यात आली नसल्याने पोलिसांनी कार्यक्रमाला परवानगी नाकारली होती.

लावणी नृत्यांगणा राधा पाटील (रा. मुंबई), एम्पायर ग्रुप ए के बॉइजचे अध्यक्ष भूषण अभिमान सोनवणे (रा. अंबामाता मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज) आणि आयोजक अमोल काटे (रा. कात्रज) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. राधा पाटील यांची लावणी नृत्यांगणा म्हणून महाराष्ट्रात मोठी लोकप्रियता असून, विविध कार्यक्रमांसाठी त्यांना राज्यभरातून आमंत्रित केले जाते.

याप्रकरणी पोलीस हवालदार नंदलाल हरिचंद्र भादले यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहीहंडी उत्सवानिमित्त एम्पायर ग्रुप ए के बॉइजचे अध्यक्ष भूषण सोनवणे यांनी राधा पाटील यांच्या लावणी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी परवानगी मिळावी, यासाठी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात अर्ज करण्यात आला होता.

दरम्यान, महाराष्ट्रातील कला, लोककला, चित्रपट आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसंदर्भात रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाच्या नियमांनुसार आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे सादर करण्याबाबत पोलिसांना सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार भूषण सोनवणे यांना कार्यक्रमासाठी आवश्यक कागदपत्रे विहित नमुन्यात सादर करण्यास सांगण्यात आले होते.

 

मात्र, मंडळाचे अध्यक्ष, आयोजक आणि प्रत्यक्ष कार्यक्रम सादर करणाऱ्या राधा पाटील यांच्याकडून आवश्यक प्राधिकृत कागदपत्रे किंवा प्रमाणपत्रे सादर करण्यात आली नाहीत. त्यामुळे बिबवेवाडी पोलिसांनी कार्यक्रमाची परवानगी नाकारली होती. असे असतानाही कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याने पोलिसांनी संबंधित तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

मृत्यू दाखला काढण्याचे नियम बदलले! १ ऑक्टोबरपासून डेथ सर्टिफिकेट मिळवणे होणार अत्यंत कडक

Monday, 28 September 2026, 22:58

दिवाळी-छठसाठी पुणे रेल्वे विभागाचा मोठा निर्णय; २१६ विशेष फेऱ्या सुरू

Monday, 28 September 2026, 22:27

वर्षानुवर्षे रखडलेला बाणेर-पाषाण लिंक रोड आता पूर्णत्वास येणार; वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्याची चिन्हे

Monday, 28 September 2026, 21:50

साडेसतरानळीत पोलिसांच्या वाहनांसारख्या गाड्यांचा वापर? पुनावाला ग्रुपच्या सुरक्षा रक्षकांवर गंभीर आरोप; अमोल नाना तुपे यांच्याकडून चौकशीची मागणी

Monday, 28 September 2026, 20:56

‘झोपडपट्टींत राहून मुलांचं वळण बिघडलं’ मोठ्या भावाने वेगळं राहण्याची भाषा करताच लहाण्याचं डोकं फिरलं; भावाच्याच पोटात चाकूने वार केला अन्…

Monday, 28 September 2026, 20:15

सुनेत्रा पवारांसमोरच माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या सभेत राडा! सभासद आणि व्यवस्थापनात बाचाबाची; तणावामुळे बैठकीत गोंधळ

Monday, 28 September 2026, 19:37
Next Post

पुण्यात टोळक्याला हटकणं पडलं महागात! सकाळी कुत्र्याला फिरायला घेऊन गेला; टोळक्यासोबत बाचाबाची अन् तरुणासोबत घडलं भयंकर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp