Saturday, October 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दौंड येथे दारूसाठी पैसे न दिल्याने महिलेला मारहाण ; मुलाच्या खिशातून 2 हजार हिसकावले, भाजीमंडईतील प्रकार

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Tuesday, 22 September 2026, 17:06

दौंड, ता. २२ : दारू पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याच्या रागातून एका महिलेला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून, तिच्या मुलाच्या पॅन्टच्या खिशातून जबरदस्तीने 2 हजार रुपये हिसकावून नेल्याची घटना घडली. यावेळी लोखंडी पाईप उगारून धमकावल्याचा आरोपही करण्यात आला आहे. ही घटना दौंड शहरातील इंदिरानगर भाजीमंडई परिसरात सोमवारी (ता. 21) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली.

या प्रकरणी रेश्मा ज्ञानेश्वर आरके (वय-30, रा. इंदिरानगर भाजीमंडई, दौंड) यांनी दौंड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून विशाल किसन थोरात आणि त्याच्या एका अनोळखी साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी चारच्या सुमारास इंदिरानगर भाजीमंडई परिसरातील एका पडक्या इमारतीसमोर आरोपींनी फिर्यादी महिलेकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. पैसे दे, अन्यथा दारू आणून दे, असे म्हणत तिच्याशी वाद घातला. यानंतर आरोपींनी फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. तसेच लोखंडी पाईप उगारून दहशत निर्माण करण्यात आली. त्यानंतर फिर्यादीच्या मुलगा सोहम याच्या पॅन्टच्या खिशातून 500 रुपयांच्या चार नोटा, अशी एकूण 2 हजार रुपयांची रोकड जबरदस्तीने काढून घेण्यात आली.

दरम्यान, आरोपींनी फिर्यादीच्या मुलाला धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. या प्रकरणी दौंड पोलिस ठाण्यातविविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक रुपेश कदम करीत आहेत.

 

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

पुणे-सातारा महामार्गावर मृत्यूचा थरार! भीषण अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा जागीच अंत; रस्त्याच्या कामावर प्रश्नचिन्ह!

Saturday, 17 October 2026, 21:15

भिवंडी, अंबरनाथ, चाकणसह सात गोदामांवर छापे!8392 किलो मुदतबाह्य अन्नपदार्थ जप्त, 4 कंपन्यांचे परवाने निलंबित..

Saturday, 17 October 2026, 20:42

‘गोल्डन मॅन’ सचिन शिंदे खून प्रकरणातील आरोपी मनोज साळवे निर्दोष!

Saturday, 17 October 2026, 20:14

Loni Kalbhor News : फ्लिटगार्ड कंपनीतील वादाचा राग गेटबाहेर; कामगाराला लोखंडी कड्याने मारहाण! तिघांवर गुन्हा दाखल

Saturday, 17 October 2026, 20:03

न्हावरेत मेंढपाळ महिलेने धाडसाने बिबट्याला पिटाळले; मात्र, बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार…..

Saturday, 17 October 2026, 19:50

कवडीपाटमध्ये भरदिवसा घरफोडी; दोन फ्लॅट फोडून रोख रकमेसह 14 लाखांच्या दागिन्यांवर चोरट्यांनी मारला डल्ला

Saturday, 17 October 2026, 19:41
Next Post

सहकाऱ्यांच्या चौकशीवरून जरांगे पाटील संतापले! आरक्षणासाठी पुन्हा दंड थोपटले,म्हणाले, ''आरक्षण सोडायला आम्ही…'

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp