Monday, November 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

समृद्धी महामार्गावर झालेल्या साखळी अपघातानंतर UAE मध्येही 23 वाहनांची धडक; 14 जणांचा मृत्यू, 38 जखमी

Shreya Varkeby Shreya Varke
Monday, 16 November 2026, 9:33

मुंबई: संयुक्त अरब अमिरातीतील (UAE) फुजैराह येथे झालेल्या भीषण साखळी अपघातात 4 भारतीयांसह 14 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत 30 नागरिक जखमी झाले असून, त्यामध्ये 7 भारतीयांचा समावेश आहे. 12 नोव्हेंबर रोजी घडलेल्या या अपघातात ट्रकसह एकूण 23 वाहनांची धडक झाली. या घटनेमुळे रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

मृतांमध्ये केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यातील एकाच कुटुंबातील 3 सदस्यांचा समावेश आहे. मोहम्मद अस्मिल, त्यांची जुळी बहीण मिस्ना जुबिन आणि 3 वर्षांचा भाचा मोहम्मद फैयस यांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला. गुजरातमधील 13 वर्षीय आतिफ मोहम्मद इमरान मन्सूर याचाही मृतांमध्ये समावेश आहे. तो कुटुंबासह भारतात परतण्यासाठी विमानतळाकडे जात असताना हा अपघात झाला. त्याचे आई-वडील आणि बहीण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

प्राथमिक तपासानुसार, शेख खलिफा बिन झायेद रोडवर सलग दोन अपघात झाले. रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रकला एका वाहनाने धडक दिल्यानंतर दुसऱ्या ट्रकने अनेक वाहनांना धडक दिली. या धडकेनंतर ट्रक पलटी झाला. रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने एका मार्गिकेवरील वाहतूक बंद होती. त्यामुळे अपघाताची परिस्थिती अधिक गंभीर झाली. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. भारतीय वाणिज्य दूतावासाकडून मृतांच्या कुटुंबीयांना आणि जखमींना मदत केली जात आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातही समृद्धी महामार्गावर 13 नोव्हेंबर रोजी भीषण साखळी अपघात झाला. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यात दुसरबीडजवळ तब्बल 19 कार एकमेकांवर आदळल्या. या घटनेत 8 जण जखमी झाले.

अपघातग्रस्त कंटेनर बाजूला काढण्याचे काम सुरू असल्याने मुंबईकडे जाणारी वाहतूक थांबवण्यात आली होती. याचवेळी भरधाव ट्रकचालकाचे नियंत्रण सुटले आणि उभ्या वाहनांना धडक बसली. परदेशातील आणि महाराष्ट्रातील या दोन्ही घटनांमुळे वाहनांचा वेग, सुरक्षित अंतर आणि रस्त्यावरील काळजी यांचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

समृद्धी महामार्गावर झालेल्या साखळी अपघातानंतर UAE मध्येही 23 वाहनांची धडक; 14 जणांचा मृत्यू, 38 जखमी

Monday, 16 November 2026, 9:33

तळेगावच्या बंद कारखान्याला मिळणार नवसंजीवनी! अमित शाहांकडून 1,500 कोटींची घोषणा

Monday, 16 November 2026, 9:10

राज्यात दुष्काळ, मॅरेथॉनवर 50 लाखांची उधळपट्टी कशासाठी? रवींद्र धंगेकरांचा मुरलीधर मोहोळांवर हल्लाबोल

Monday, 16 November 2026, 8:51

पुण्यातील एअर होस्टेस वर्षा तुरकर यांची निर्घृण हत्या? वैनगंगा नदीकाठी आढळल्या रक्ताच्या थारोळ्यात

Monday, 16 November 2026, 8:34

राज्यात हुडहुडी, पारा आणखी घसरणार! धुळे १०.४ अंशांवर; उत्तर महाराष्ट्रासह विदर्भात थंडीचा जोर वाढण्याचे संकेत

Monday, 16 November 2026, 8:25

नोव्हेंबरच्या मध्यात हवामानाचा नवा बदल! सकाळी थंडी, दुपारी उन्हाचा चटका; पुढील काही दिवस कसे असणार वातावरण? वाचा

Monday, 16 November 2026, 8:00
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp