Thursday, June 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

“साखळाई प्रकल्पावरून पाण्याचा संघर्ष भडकणार? घोड धरणातील हक्काच्या पाण्यासाठी शिरूर-श्रीगोंदा आमनेसामने”

योगेश मारणेby योगेश मारणे
Sunday, 12 April 2026, 20:37

न्हावरे: तब्बल चार दशकांपासून रखडलेली साखळाई उपसा सिंचन योजना अखेर मार्गी लागण्याच्या उंबरठ्यावर असताना,या प्रकल्पाभोवती आता वादाचे ढग गडद होऊ लागले आहेत. शासनाकडून या महत्त्वाकांक्षी योजनेला हिरवा कंदील मिळताच एकीकडे श्रीगोंदा व अहमदनगर तालुक्यांत समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे तर दुसरीकडे घोड धरणाच्या मूळ लाभक्षेत्रातील शिरूर तालुक्यातील शेतकरी संतप्त झाले असून “आमच्या हक्काच्या पाण्यावर डाका टाकू नका” असा तीव्र आक्रोश व्यक्त होत आहे.

अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारातून सुमारे १,२३४ कोटी रुपयांच्या या योजनेला मंजुरी मिळाली आहे. या योजनेअंतर्गत श्रीगोंदा व अहिल्यानगर तालुक्यातील सुमारे २९ गावांना पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे.मात्र,या निर्णयामुळे घोड धरणाच्या पाण्यावर आधीपासून अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे.

 

घोड धरणाची मूळ साठवण क्षमता सुमारे ७.१० टीएमसी असली,तरी प्रत्यक्षात उपलब्ध पाणी केवळ ५.५० टीएमसी असल्याचे सांगितले जाते. या मर्यादित पाण्यातून शेती, पिण्याचे पाणी आणि औद्योगिक गरजा भागवल्या जात असताना, नव्या योजनेसाठी ८.८ टीएमसी शेतीसाठी व ०.२० टीएमसी पिण्यासाठी पाणी आरक्षित करण्याचा प्रस्ताव आहे. यामुळे “आधीच टंचाई सहन करतोय,आता आमचंच पाणी वळवलं तर आम्ही जगायचं कसं?” असा संतप्त सवाल लाभधारक शेतकरी उपस्थित करत आहेत.

या प्रकल्पामुळे शिरूर तालुक्यातील शेती, उद्योग आणि पिण्याच्या पाण्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.त्यामुळे शेतकरी आक्रमक झाले असून, “हक्काच्या पाण्यावर कुणाचाही अतिक्रमण चालणार नाही” अशी ठाम भूमिका घेत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

“घोड धरणावरून साखळाई योजना राबवणे हे शिरूरच्या विद्यमान लोकप्रतिनिधींचे सर्वात मोठे अपयश आहे.तर,अहमदनगरचे पालकमंत्री विखे पाटील यांनी नियोजित साखळाई योजनेमुळे त्यांचा मतदारसंघ भविष्यातील राजकीय दृष्ट्या अधिक सुरक्षित केला आहे. या योजनेमुळे घोड धरण लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांवर अन्याय होणार आहे. कारण,मागील दहा वर्षांपासून घोड धरणातील पाणीसाठा मे महिन्यातच संपुष्टात येतो.त्यामुळे शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांना येथून पुढे भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल.”
-बाळासाहेब घाटगे (अध्यक्ष-पश्चिम महाराष्ट्र शेतकरी संघटना)

“पूर्वी काही वर्षांपूर्वी स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील यांनीच घोड धरणावरून साखळाई योजनेला विरोध केला होता.तसेच त्यांनी ही योजना कधी सुरू होणार नाही, असेही सांगितले होते. त्यामुळे शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा नियोजित साखळाई योजनेला तीव्र विरोध आहे.”
-दिलीपराव मोकाशी (माजी संचालक,घोडगंगा सहकारी साखर कारखाना)

 

 

योगेश मारणे

योगेश मारणे

लेखक सुमारे १८ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. दैनिक प्रभात, सामना आणि पुण्यनगरी या वृत्तपत्रांमध्ये बातमीदार म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. राजकारण, क्राईम आणि शोध पत्रकारिता यामध्ये विशेष कामाचा अनुभव तसेच दोन वर्षांपासून 'पुणे प्राईम न्यूज'मध्ये प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यात ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या आंदोलनाची धास्ती! पोलिसांचा ‘डिजिटल पहारा’; 21 कॅमेऱ्यांमधून ठेवणार हालचालींवर लक्ष

Wednesday, 10 June 2026, 22:59

सांगली पालिकेचा ‘सर्जिकल स्ट्राईक’! 90 दिवसांपासून गायब असलेल्या 37 कर्मचाऱ्यांचे निलंबन; आयुक्तांच्या धडक कारवाईने खळबळ

Wednesday, 10 June 2026, 22:24

काळाचा क्रूर घाला! मामाच्या गावी निघालेली भावंडं घरी परतलीच नाहीत; एकाच अपघातात तिन्ही भावंडांचा बळी

Wednesday, 10 June 2026, 21:42

नवले पुलाखाली भीषण अपघात! भरधाव सिमेंट टँकर उलटून डिलिव्हरी बॉयचा जागीच मृत्यू; परिसरात खळबळ

Wednesday, 10 June 2026, 21:00

पुण्यात साडेचौदा वर्षांच्या मुलीचा विवाह लावून दिला! पती आणि नातेवाईकांविरोधात खराडी पोलिसांची मोठी कारवाई

Wednesday, 10 June 2026, 20:18

“मी साधा माणूस, तुम्ही मोठी माणसं”; दत्तात्रय भरणे यांची शेतकऱ्यांशी ‘मस्करी’? ‘त्या’ एका वक्तव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात

Wednesday, 10 June 2026, 19:38
Next Post

कात्रज-कोंढवा रस्ता कोंडीतून मुक्त होणार! भू-संपादनासाठी कोट्यवधींचा निधी मंजूर; जून २०२६ पर्यंत पहिला टप्पा पूर्ण करण्याचा संकल्प

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.