Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

नवले पुलाखाली भीषण अपघात! भरधाव सिमेंट टँकर उलटून डिलिव्हरी बॉयचा जागीच मृत्यू; परिसरात खळबळ

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 10 June 2026, 21:00

पुणे : कात्रज बायपास रस्त्यावरील नवले पुलाखाली मध्यरात्री भीषण अपघात घडला. भरधाव वेगातील सिमेंट टँकर चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्यावर उलटला. या दुर्घटनेत एका दुचाकीस्वार डिलिव्हरी बॉयचा जागीच मृत्यू झाला असून 3 ते 4 जण गंभीर जखमी झाले आहेत.

मृत व्यक्तीचे नाव रामेश्वर मच्छिंद्र उगले असे असून ते डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होते. अपघाताच्या वेळी ते कामावर असताना या दुर्घटनेचे बळी ठरले.

प्राथमिक माहितीनुसार, सिमेंटने भरलेला 10 टायरचा अवजड टँकर कात्रज बायपास मार्गावरून जात होता. नवले पुलाखालील वळणाजवळ आल्यानंतर चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. त्यानंतर टँकर रस्त्यावर उलटला आणि त्याचवेळी तेथून जाणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक बसली. धडकेनंतर दुचाकी टँकरखाली अडकल्याने रामेश्वर उगले यांचा जागीच मृत्यू झाला.

 

या अपघातात इतर 3 ते 4 जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि आपत्कालीन यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. पोलिसांनी टँकर चालकाला ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताचे नेमके कारण आणि टँकरचा वेग याबाबत अधिक तपास सुरू आहे.

दरम्यान, अपघातानंतर कात्रज बायपास मार्गावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती. रस्त्यावर उलटलेला टँकर हटविण्यासाठी क्रेनची मदत घेण्यात आली. पोलिस आणि प्रशासनाने सुमारे 2 ते 3 तास प्रयत्न करून वाहतूक सुरळीत केली.

या घटनेचा सीसीटीव्ही फुटेजही समोर आला असून अपघाताची तीव्रता त्यातून दिसून येत आहे. नवले पूल परिसरात वारंवार अपघात होत असल्याने हा भाग अपघातप्रवण ठरत असल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. स्थानिक नागरिकांनी या ठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post

काळाचा क्रूर घाला! मामाच्या गावी निघालेली भावंडं घरी परतलीच नाहीत; एकाच अपघातात तिन्ही भावंडांचा बळी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.