Tuesday, September 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

छत्रपती संभाजीनगरमध्ये स्पा-सलून सेंटरवर कारवाई न करण्यासाठी ८० हजारांची लाच घेणारा हेड कॉन्स्टेबल एसीबीच्या जाळ्यात

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 6 September 2026, 20:37

छत्रपती संभाजीनगर: स्पा आणि सलून सेंटरवर कायदेशीर कारवाई न करण्यासाठी १ लाख ३० हजार रुपयांची लाच मागून तडजोडीनंतर ८० हजार रुपये स्वीकारताना गुन्हे शाखेतील हेड कॉन्स्टेबल दादासाहेब बाबासाहेब झारगड यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. छत्रपती संभाजीनगरमधील दूध डेअरी चौकात गुरुवारी (४ सप्टेंबर) ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी झारगड यांच्याविरुद्ध क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, त्यांच्या निवासस्थानी एसीबीकडून झडती घेण्यात येत आहे.

तक्रारदार आणि त्यांच्या महिला सहकारी छत्रपती संभाजीनगर शहरात स्पा आणि सलून सेंटर चालवतात. हे सेंटर कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरू ठेवण्यासाठी तसेच त्यावर कायदेशीर कारवाई न करण्यासाठी गुन्हे शाखेतील हेड कॉन्स्टेबल दादासाहेब झारगड यांनी तक्रारदाराकडे १ लाख ३० हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.

लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने २९ ऑगस्ट रोजी एसीबीच्या छत्रपती संभाजीनगर कार्यालयात तक्रार दाखल केली. तक्रार मिळाल्यानंतर एसीबीच्या पथकाने पंचांसमक्ष लाच मागणीची पडताळणी केली. त्यावेळी झारगड यांनी स्पा आणि सलून सेंटरवर कारवाई न करण्यासाठी १ लाख ३० हजार रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर तडजोडीअंती ८० हजार रुपये स्वीकारण्याचे त्यांनी मान्य केले.

लाच मागितल्याचे स्पष्ट झाल्यानंतर एसीबीने गुरुवारी सापळा रचला. झारगड यांनी तक्रारदाराला फोन करून लाचेची रक्कम घेऊन दूध डेअरी चौकात येण्यास सांगितले. ठरल्याप्रमाणे तक्रारदार तेथे पोहोचल्यानंतर पंचांसमक्ष ८० हजार रुपयांची रक्कम झारगड यांनी स्वीकारली. त्याचवेळी दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहात ताब्यात घेतले.

 

या प्रकरणी दादासाहेब झारगड यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ मधील कलम ७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच त्यांच्या निवासस्थानी एसीबीकडून झडती घेण्यात येत असून, त्यांच्या मालमत्तेबाबतही तपास केला जात आहे. या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! राज्यसेवा मुख्य परीक्षेसह तीन महत्त्वाच्या परीक्षांना अचानक स्थगिती

Tuesday, 29 September 2026, 10:32

बंद राजगड कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी मोठी तयारी! 467 कोटींचा प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत; आधुनिक प्रकल्प उभारण्याचे नियोजन

Tuesday, 29 September 2026, 9:33

इन्फ्लुएन्सर निधी तिवारीच्या मृत्यूला अचानक नवं वळण! सोनू सिंहसोबत वाढली होती जवळीक, तो विवाहित अन् 2 मुलांचा बाप; आईचा मोठा दावा

Tuesday, 29 September 2026, 9:28

बारामतीत दुहेरी हत्याकांड! माजी सरपंच महिलेसह दोघींना झोपेतच गळे चिरून संपवलं; परिसरात खळबळ

Tuesday, 29 September 2026, 9:14

बारामतीच्या गजबजलेल्या राजहंस चौकात थरार! दोन तरुणांवर कोयत्याने सपासप वार; नेमकं काय घडलं? वाचा

Tuesday, 29 September 2026, 8:26

विलीनीकरण होणार की नाही? शरद पवारांनी संभ्रम केला दूर; म्हणाले, “त्यांनी आमच्यासोबत यावं….”

Tuesday, 29 September 2026, 8:14
Next Post

शिरूरमध्ये मध्यरात्री थरार! गाडीला बस घासल्याचा बनाव करत बसच्या चालक-वाहकाला मारहाण; तिकिटाचे पैसे लुटले, चावी हिसकावत दगडफेक करत लुटारू पसार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp