Tuesday, September 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शिरूरमध्ये मध्यरात्री थरार! गाडीला बस घासल्याचा बनाव करत बसच्या चालक-वाहकाला मारहाण; तिकिटाचे पैसे लुटले, चावी हिसकावत दगडफेक करत लुटारू पसार

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 6 September 2026, 21:07

पुणे: शिरूरमध्ये स्कॉर्पिओ जीप एसटी बसला आडवी लावून चालक आणि वाहकाला मारहाण करत त्यांच्याकडील ८ हजार ९६० रुपयांची रोकड लुटल्याची घटना घडली. या प्रकरणी शिरूर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने चार जणांना अटक केली आहे. अजयकुमार शिनू चव्हाण (२४), सचिन अशोक घोलप (२२), पवन मधुकर घोलप (२५) आणि आकाश सोमनाथ काळे (२१) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. शिरूर न्यायालयाने चौघांना मंगळवार (८ सप्टेंबर)पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

ही घटना शुक्रवारी (४ सप्टेंबर) मध्यरात्री दोनच्या सुमारास पुणे-अहिल्यानगर मार्गावरील न्हावरे फाटा येथे घडली. आरोपींनी विनाक्रमांकाची काळ्या रंगाची स्कॉर्पिओ जीप एसटी बससमोर आडवी लावून पुण्याहून शिरूरकडे जाणारी एमएच १४ एनपी ०८३८ क्रमांकाची बस अडवली. त्यानंतर आपल्या जीपला बस घासल्याचा बनाव करून चालक संदीप गणपत थोरवे यांच्याकडे नुकसानभरपाईची मागणी केली.

बसला जीप घासली नसल्याचे चालकाने सांगितल्यानंतर आरोपींनी त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. चालकाला वाचवण्यासाठी वाहक सतीश अण्णासाहेब बाचकर धावून आले असता त्यांनाही मारहाण करण्यात आली. त्यानंतर आरोपींनी वाहकाकडील प्रवाशांच्या तिकिटातून जमा झालेली ८ हजार ९६० रुपयांची रोकड आणि बसची चावी जबरदस्तीने हिसकावून घेतली. बसवर दगडफेक करून आरोपींनी तेथून पळ काढला. आरोपींनी जीपमधून कोयते काढण्याची धमकी दिल्याने बसमधील प्रवाशांमध्येही घबराट निर्माण झाली होती.

घटनेनंतर चालक आणि वाहकांनी शिरूर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिस निरीक्षक विनोद पाटील यांनी घटनेची गंभीर दखल घेत गुन्हे शोध पथकाला आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. पोलिस उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नीतेश थोरात, विजय शिंदे, नीरज पिसाळ, राहुल वाघमोडे, अंबादास थोरे, निखील रावडे, सचिन भोई, अजय पाटील आणि दादाराव नागरे यांच्या पथकाने तपास सुरू केला.

 

आरोपींचा माग काढण्यासाठी पोलिसांनी शिरूर परिसरासह अहिल्यानगर, आळंदी, भोसरी आणि निगडी परिसरातील शंभरहून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयितांची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी विविध ठिकाणी सापळे रचून चौघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली काळ्या रंगाची स्कॉर्पिओ (एमएच १४ एनडब्ल्यू ५२३४) जप्त करण्यात आली आहे.

दरम्यान, अटक केलेले आरोपी अहिल्यानगर जिल्ह्यातील एका बड्या राजकीय नेत्याच्या संपर्कात असल्याची माहिती तपासात समोर आल्याचे सांगण्यात येत आहे. या संपर्काचे स्वरूप आणि त्याचा या गुन्ह्याशी काही संबंध आहे का, याबाबत पोलिसांकडून तपास केला जात आहे. पोलिस उपनिरीक्षक शुभम चव्हाण पुढील तपास करीत आहेत.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

हवामानाच्या बदलत्या चक्रामुळे बळीराजा संकटात! पाऊस पडणार की नाही? जाणून घ्या सविस्तर अंदाज

Monday, 7 September 2026, 22:57

पेपरफुटीच्या आरोपांवर अखेर MPSC अध्यक्षांनी सोडले मौन! म्हणाले “माझ्याविरोधात एक जरी पुरावा दिला तर मी एका सेकंदात राजीनामा देईन!”

Monday, 7 September 2026, 22:28

भारतीय क्रिकेटच्या इतिहासात २८ वर्षांनंतर घडणार चमत्कार! एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या देशांत दोन सामने खेळणार टीम इंडिया

Monday, 7 September 2026, 21:51

शिरूरमध्ये संतापजनक प्रकार! वडापाव अन् पैशांचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर दोनदा अत्याचार; आरोपी जेरबंद

Monday, 7 September 2026, 21:38

केतन अग्रवाल खून प्रकरणात मोठी अपडेट! सिया-चेतनचा मित्रच निघाला मास्टरमाइंड; रितेश हांडेला पोलिसांकडून अटक

Monday, 7 September 2026, 20:54

गोविंदांचा थरार अन् जनसागराचा जल्लोष; इंदापूरची दहीहंडी ठरली चर्चेचा विषय

Monday, 7 September 2026, 20:12
Next Post

वाघोली–केसनंद वाहतूक कृती समितीची बैठक संपन्न! वाहतूक कोंडी फोडण्यासाठी विविध उपाययोजनांची मागणी; कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp