Wednesday, September 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पेपरफुटीच्या आरोपांवर अखेर MPSC अध्यक्षांनी सोडले मौन! म्हणाले “माझ्याविरोधात एक जरी पुरावा दिला तर मी एका सेकंदात राजीनामा देईन!”

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 7 September 2026, 22:28

मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षांमध्ये कथित पेपरफुटी आणि कारभारावरून राज्यातील स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांमध्ये नाराजी वाढली आहे. पुण्यात विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने एकत्र येत आक्रोश मोर्चा काढला. या पार्श्वभूमीवर MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी निवेदनाद्वारे आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आपल्यावर होत असलेले आरोप तथ्यहीन असून वैयक्तिक पातळीवर प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. माझ्याविरोधात एकही ठोस पुरावा समोर आल्यास पदावर राहणार नाही, असेही भीमनवार यांनी स्पष्ट केले.

औषध निरीक्षक गट-ब परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणावर बोलताना त्यांनी सांगितले की, ही घटना आपण आयोगाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी घडली होती. तक्रार मिळाल्यानंतर आयोगाने पोलिसांकडे तातडीने तक्रार दाखल केली असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी आयोगाने उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. राज्य सरकारनेही स्वतंत्र उच्चाधिकार समिती स्थापन केली असून विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी चर्चा केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

आपल्या कार्यकाळातील कामकाजाची माहिती देताना भीमनवार यांनी विविध सुधारणा करण्यात आल्याचा दावा केला. आतापर्यंत स्पर्धा परीक्षा आणि सरळसेवा भरतीच्या मिळून 84 चाळणी परीक्षा घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच निकाल जाहीर होण्यासाठी लागणारा कालावधी कमी करून 18 ते 21 दिवसांपर्यंत आणण्यात यश आल्याचे त्यांनी नमूद केले. भविष्यात सर्व परीक्षांचे निकाल एका महिन्यात जाहीर करण्याचे नियोजन असल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, पुण्यात विद्यार्थ्यांनी ओंकारेश्वर मंदिरापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आक्रोश मोर्चा काढला. परीक्षा रद्द झाल्याने संतप्त विद्यार्थ्यांनी MPSC अध्यक्ष आणि सचिवांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. सुप्रिया सुळे, रोहित पवार आणि विश्वजीत कदम आंदोलनात सहभागी झाले. आदित्य ठाकरे आणि अभिजीत दिपके यांनीही आंदोलनाला पाठिंबा दिला. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणे यात राजकारण नसल्याचे रोहित पवार यांनी म्हटले.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुणेकरांची डोकेदुखी वाढली! बहुचर्चित कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरण पुन्हा एकदा भूसंपादनाच्या कचाट्यात

Tuesday, 22 September 2026, 23:03

विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर आणि पुणे विभाग शिक्षक मतदार संघासाठी २३ ऑक्टोबरला मतदान

Tuesday, 22 September 2026, 22:27

पाऊस आला, पालिका झोपली; वाहतूक पोलिसांनीच चेंबर उघडून रस्ता केला मोकळा

Tuesday, 22 September 2026, 22:07

पुण्यातील शिल्पा गवारे मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा! पोलिसांचं ‘क्राईम सीन रिक्रिएशन’; पुन्हा त्या जागेची झडती घेतली अन्…

Tuesday, 22 September 2026, 21:18

गाडी घासल्याच्या कारणावरून हायवेवर राडा! तिघांना काठीने बेदम मार मारहाण; वाघोली येथील पाच जणांना अटक

Tuesday, 22 September 2026, 20:31

८,५०० रुपयांची लाच महागात पडली! सोलापूर जि.प.च्या वरिष्ठ सहाय्यकाला न्यायालयाकडून ३ वर्षांच्या कारावासाची शिक्षा

Tuesday, 22 September 2026, 20:27
Next Post

हवामानाच्या बदलत्या चक्रामुळे बळीराजा संकटात! पाऊस पडणार की नाही? जाणून घ्या सविस्तर अंदाज

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp