Tuesday, September 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणेकरांची डोकेदुखी वाढली! बहुचर्चित कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरण पुन्हा एकदा भूसंपादनाच्या कचाट्यात

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 22 September 2026, 23:03

पुणे : कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरणाच्या कामाला पुन्हा एकदा भूसंपादनाचा अडथळा निर्माण झाला आहे. रस्त्यासाठी आवश्यक असलेल्या उर्वरित 10 मिळकतींच्या भूसंपादनाची प्रक्रिया शासन स्तरावर सुरू असली, तरी अद्याप मोजणी पूर्ण झालेली नाही. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी मार्च 2027 पर्यंत 50 मीटर रुंदीचा रस्ता पूर्ण करण्याबाबत दिलेल्या आश्वासनाच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

या मिळकतींची मोजणी, नव्याने निवाडा आणि त्यानंतरच्या प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मागील अनुभव लक्षात घेता आणखी तीन ते चार महिन्यांचा कालावधी लागू शकतो. ही प्रक्रिया वेळेत पूर्ण न झाल्यास मार्च 2027ची अंतिम मुदत गाठणे महापालिकेसाठी कठीण ठरण्याची शक्यता आहे.

रस्ता रुंदीकरणाच्या मार्गात काही ठिकाणी खासगी मिळकतींचा अडथळा कायम असल्याने पथ विभागाला संपूर्ण सेवा रस्ता कार्यान्वित करता आलेला नाही. त्याचा थेट परिणाम मुख्य रस्त्याच्या कामाच्या गतीवरही होत आहे.

सुंदरबन, माऊलीनगरमधील मिळकती महत्त्वाचा अडथळा

 

सुंदरबन परिसरातील काही मिळकती तसेच माऊलीनगर चौकातील चार बांधकाम असलेल्या मिळकती अद्याप जागेवर आहेत. त्यामुळे प्रस्तावित ग्रेड सेपरेटर आणि पुलाच्या कामालाही गती मिळालेली नाही.

या मिळकतींचे भूसंपादन पूर्ण करणे, प्रत्यक्ष जागा ताब्यात घेऊन मोकळी करणे आणि त्यानंतर बांधकाम सुरू करणे यासाठी नेमका किती कालावधी लागेल, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.

सेवा रस्त्याचे 60 टक्के काम पूर्ण

दरम्यान, कात्रज-कोंढवा मार्गावरील सेवा रस्त्याचे सुमारे 60 टक्के काम पूर्ण झाले आहे. सुंदरबन आणि माऊलीनगर चौकातील अडथळे वगळता उर्वरित सेवा रस्त्याचे काम पुढील महिनाभरात पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे पथ विभागाकडून सांगण्यात येत आहे.

सेवा रस्ता पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यास स्थानिक वाहतुकीवरील ताण कमी होण्यास मदत होईल. मात्र, मुख्य रस्ता, ग्रेड सेपरेटर आणि पुलाचे काम भूसंपादनाशी थेट जोडलेले असल्याने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे भवितव्य आता प्रशासन भूसंपादनाची प्रक्रिया किती वेगाने पूर्ण करते, यावर अवलंबून आहे.

त्यामुळे मार्च 2027 पर्यंत कात्रज-कोंढवा रस्ता पूर्ण करण्याचे महापालिका आयुक्तांचे आश्वासन प्रत्यक्षात पूर्ण होणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुणेकरांची डोकेदुखी वाढली! बहुचर्चित कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरण पुन्हा एकदा भूसंपादनाच्या कचाट्यात

Tuesday, 22 September 2026, 23:03

विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर आणि पुणे विभाग शिक्षक मतदार संघासाठी २३ ऑक्टोबरला मतदान

Tuesday, 22 September 2026, 22:27

पाऊस आला, पालिका झोपली; वाहतूक पोलिसांनीच चेंबर उघडून रस्ता केला मोकळा

Tuesday, 22 September 2026, 22:07

पुण्यातील शिल्पा गवारे मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा! पोलिसांचं ‘क्राईम सीन रिक्रिएशन’; पुन्हा त्या जागेची झडती घेतली अन्…

Tuesday, 22 September 2026, 21:18

गाडी घासल्याच्या कारणावरून हायवेवर राडा! तिघांना काठीने बेदम मार मारहाण; वाघोली येथील पाच जणांना अटक

Tuesday, 22 September 2026, 20:31

८,५०० रुपयांची लाच महागात पडली! सोलापूर जि.प.च्या वरिष्ठ सहाय्यकाला न्यायालयाकडून ३ वर्षांच्या कारावासाची शिक्षा

Tuesday, 22 September 2026, 20:27
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp