Tuesday, September 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

८,५०० रुपयांची लाच महागात पडली! सोलापूर जि.प.च्या वरिष्ठ सहाय्यकाला न्यायालयाकडून ३ वर्षांच्या कारावासाची शिक्षा

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 22 September 2026, 20:27

सोलापूर : कनिष्ठ लिपिक पदाच्या वैयक्तिक मान्यतेची फाईल तयार करून ती वरिष्ठांकडे सादर करण्यासाठी ८ हजार ५०० रुपयांची लाच मागणाऱ्या शिक्षण विभागातील तत्कालीन वरिष्ठ सहाय्यकाला न्यायालयाने तीन वर्षांच्या सक्षम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच त्याच्यावर १० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. दंडाची रक्कम न भरल्यास आणखी तीन महिने सक्षम कारावास भोगावा लागणार आहे.

गिरीशचंद्र सुदामराव वाघमारे हे तत्कालीन वरिष्ठ सहाय्यक, शिक्षण विभाग (माध्यमिक), जिल्हा परिषद सोलापूर येथे कार्यरत होते. तक्रारदार यांच्या कनिष्ठ लिपिक पदाच्या वैयक्तिक मान्यतेची फाईल तयार करून ती वरिष्ठांकडे सादर करण्यासाठी वाघमारे यांनी ८ हजार ५०० रुपयांची लाच मागितल्याचा आरोप होता. याप्रकरणी तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सोलापूर येथे लेखी तक्रार दिली होती.

तक्रारीनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. यावेळी वाघमारे यांनी लाच स्वीकारल्यानंतर त्यांना पकडण्यात आले. त्यांच्याविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाणे, सोलापूर शहर येथे गुन्हा क्रमांक ८९४/२०१९ अन्वये भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ मधील कलम ७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक कविता मुसळे यांनी केला. तपास पूर्ण झाल्यानंतर आरोपीविरुद्ध विशेष न्यायालय, सोलापूर येथे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. या प्रकरणाचा विशेष खटला क्रमांक २५/२०२१ असा होता. सुनावणी पूर्ण झाल्यानंतर २२ सप्टेंबर २०२६ रोजी जिल्हा न्यायाधीश-३ डी. एन. सुरवसे यांच्या न्यायालयाने वाघमारे यांना दोषी ठरवून तीन वर्षांच्या सक्षम कारावासाची आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

 

सरकार पक्षातर्फे अॅड. प्रकाश जन्नु, तर आरोपीतर्फे अॅड. सुरेश पाटील-कुरुलकर यांनी काम पाहिले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कोर्ट पैरवीचे काम मधुमती शिंदे आणि गायकवाड यांनी पाहिले.

भ्रष्टाचारासंदर्भात माहिती असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या टोल फ्री क्रमांक १०६४ वर किंवा संबंधित संपर्क क्रमांकावर तक्रार नोंदवावी, असे आवाहन विभागाकडून करण्यात आले आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुणेकरांची डोकेदुखी वाढली! बहुचर्चित कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरण पुन्हा एकदा भूसंपादनाच्या कचाट्यात

Tuesday, 22 September 2026, 23:03

विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर आणि पुणे विभाग शिक्षक मतदार संघासाठी २३ ऑक्टोबरला मतदान

Tuesday, 22 September 2026, 22:27

पाऊस आला, पालिका झोपली; वाहतूक पोलिसांनीच चेंबर उघडून रस्ता केला मोकळा

Tuesday, 22 September 2026, 22:07

पुण्यातील शिल्पा गवारे मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा! पोलिसांचं ‘क्राईम सीन रिक्रिएशन’; पुन्हा त्या जागेची झडती घेतली अन्…

Tuesday, 22 September 2026, 21:18

गाडी घासल्याच्या कारणावरून हायवेवर राडा! तिघांना काठीने बेदम मार मारहाण; वाघोली येथील पाच जणांना अटक

Tuesday, 22 September 2026, 20:31

८,५०० रुपयांची लाच महागात पडली! सोलापूर जि.प.च्या वरिष्ठ सहाय्यकाला न्यायालयाकडून ३ वर्षांच्या कारावासाची शिक्षा

Tuesday, 22 September 2026, 20:27
Next Post

गाडी घासल्याच्या कारणावरून हायवेवर राडा! तिघांना काठीने बेदम मार मारहाण; वाघोली येथील पाच जणांना अटक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp