Tuesday, September 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पाऊस आला, पालिका झोपली; वाहतूक पोलिसांनीच चेंबर उघडून रस्ता केला मोकळा

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 22 September 2026, 22:07

पुणे : मंगळवारी (दि. २२ सप्टेंबर) सायंकाळी साडेचारच्या सुमारास दमदार पावसाने पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गासह हडपसर परिसरातील रस्ते जलमय झाले. हडपसर-रवीदर्शन येथे पावसाळी चेंबर तुंबल्याने मोठ्या प्रमाणावर पाणी साचून वाहतूक ठप्प झाली. महापालिका प्रशासनाकडून कोणतीही तत्पर कार्यवाही होत नसताना वाहतूक पोलिसांनीच चेंबरचे झाकण काढून त्यातील कचरा व घाण साफ केली आणि पाण्याचा निचरा मोकळा करून वाहतूक सुरळीत केली.

हडपसर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हवालदार रत्नमाला शंकर राणे आणि पोलीस शिपाई शिवाजी व्यंकटराव गोपनर यांनी मुसळधार पावसात रवीदर्शन येथील तुंबलेले चेंबर साफ करून पाण्याचा मार्ग मोकळा केला. त्यानंतर साचलेले पाणी ड्रेनेजमधून वाहून गेले आणि ठप्प झालेली वाहतूक पूर्ववत झाली.

याचवेळी पोलीस शिपाई गोपीनाथ करचे, पोलीस हवालदार अजय हगारे आणि बाबा आलकुंटे यांनीही परिस्थिती हाताळत वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून काम केले. बाबा आलकुंटे यांनी शंकर मठ परिसरातील साचलेले पाणीही हटवून वाहतुकीचा मार्ग मोकळा केला.

विशेष म्हणजे, सायंकाळी सहा ते साडेसहाच्या दरम्यान पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचून वाहनचालकांची कोंडी होत असतानाही महापालिका प्रशासनातील जबाबदार अधिकारी-कर्मचारी घटनास्थळी फिरकले नसल्याची तक्रार वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांनी केली. नागरिकांच्या करातून वेतन घेणाऱ्या यंत्रणेने पावसाळी चेंबरची नियमित स्वच्छता आणि पाण्याचा निचरा याची जबाबदारी पार पाडणे अपेक्षित असताना, ऐन पावसात ही जबाबदारी वाहतूक पोलिसांवरच येणे ही पालिका प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी बाब आहे.

 

पाऊस थांबण्याची वाट पाहणाऱ्या यंत्रणेला पोलिसांनी दिला धडा

पावसात वाहतूक कोंडी होऊन नागरिकांचे हाल सुरू असताना कार्यालयीन यंत्रणा कुठे होती, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला. दुसरीकडे, कोणतीही सबब न सांगता वाहतूक पोलिसांनी प्रत्यक्ष चेंबरमध्ये उतरून अडथळा दूर केला. त्यामुळे नागरिकांकडून रत्नमाला राणे, शिवाजी गोपनर, गोपीनाथ करचे, अजय हगारे आणि बाबा आलकुंटे यांच्या तत्परतेचे कौतुक होत आहे. प्रशासनाने अशा कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांचे अभिनंदन करावे, अशी मागणीही नागरिकांनी केली.

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणेकरांची डोकेदुखी वाढली! बहुचर्चित कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरण पुन्हा एकदा भूसंपादनाच्या कचाट्यात

Tuesday, 22 September 2026, 23:03

विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर आणि पुणे विभाग शिक्षक मतदार संघासाठी २३ ऑक्टोबरला मतदान

Tuesday, 22 September 2026, 22:27

पाऊस आला, पालिका झोपली; वाहतूक पोलिसांनीच चेंबर उघडून रस्ता केला मोकळा

Tuesday, 22 September 2026, 22:07

पुण्यातील शिल्पा गवारे मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा! पोलिसांचं ‘क्राईम सीन रिक्रिएशन’; पुन्हा त्या जागेची झडती घेतली अन्…

Tuesday, 22 September 2026, 21:18

गाडी घासल्याच्या कारणावरून हायवेवर राडा! तिघांना काठीने बेदम मार मारहाण; वाघोली येथील पाच जणांना अटक

Tuesday, 22 September 2026, 20:31

८,५०० रुपयांची लाच महागात पडली! सोलापूर जि.प.च्या वरिष्ठ सहाय्यकाला न्यायालयाकडून ३ वर्षांच्या कारावासाची शिक्षा

Tuesday, 22 September 2026, 20:27
Next Post

विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर आणि पुणे विभाग शिक्षक मतदार संघासाठी २३ ऑक्टोबरला मतदान

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp