Tuesday, September 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

वाघोली–केसनंद वाहतूक कृती समितीची बैठक संपन्न! वाहतूक कोंडी फोडण्यासाठी विविध उपाययोजनांची मागणी; कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 6 September 2026, 21:57

पुणे: वाघोली, केसनंद आणि लोणिकंद परिसरातील दिवसेंदिवस गंभीर होत चाललेल्या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी पुणे नगर रोड वाघोली-केसनंद वाहतूक कृती समितीची बैठक बकोरी येथील गोविंद बाग बँकेट हॉलमध्ये नुकतीच झाली. या बैठकीत वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी विविध उपाययोजनांवर चर्चा करून संबंधित प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना निवेदन देण्याचा निर्णय घेण्यात आला. निवेदन देऊनही ठोस कार्यवाही न झाल्यास नागरिकांच्या सहकार्याने उपोषण आणि आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला.

वाघोली, केसनंद आणि लोणिकंद परिसरातून दररोज मोठ्या संख्येने नागरिक, विद्यार्थी, कामगार, व्यावसायिक आणि प्रवासी ये-जा करतात. मात्र पुणे-नगर रोडवर वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना तासनतास अडकून राहावे लागते. यामुळे वेळ आणि इंधनाचा अपव्यय होण्याबरोबरच रुग्णवाहिका, शालेय वाहने आणि अत्यावश्यक सेवांनाही अडथळा निर्माण होत आहे.

या समस्येवर नागरिकांना एकत्र आणण्यासाठी माहिती सेवा समितीचे अध्यक्ष चंद्रकांत गोविंद वारघडे यांनी पुढाकार घेत पुणे नगर रोड वाघोली-केसनंद वाहतूक कृती समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी व्हॉट्सॲप ग्रुप तयार करण्यात आला असून, अवघ्या दोन-तीन दिवसांत सुमारे २४० नागरिक या ग्रुपमध्ये सहभागी झाले आहेत. वाहतूक पोलीस आणि संबंधित शासकीय अधिकाऱ्यांनाही या माध्यमातून जोडण्यात आले आहे.

वाहतूक कोंडीच्या ठिकाणांचे फोटो आणि व्हिडिओ नागरिकांकडून ग्रुपवर शेअर केले जात आहेत. त्यामुळे संबंधित विभागाला परिस्थितीची माहिती तातडीने मिळत असून काही ठिकाणी त्वरित कारवाई करणे शक्य झाले आहे. मात्र अशा तात्पुरत्या उपायांपेक्षा वाहतूक कोंडीचा कायमस्वरूपी प्रश्न सोडविण्याची गरज बैठकीत व्यक्त करण्यात आली.

 

यासाठी वाघोली, केसनंद आणि लोणिकंद परिसरातील प्रमुख चौकांचे रुंदीकरण, आवश्यक ठिकाणी रस्ते रुंद करणे आणि पर्यायी मार्ग तातडीने सुरू करण्याची मागणी करण्यात आली. विरुद्ध दिशेने वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करणे, वाहतुकीला अडथळा ठरणारे विद्युत पोल हलविणे आणि पुणे-नगर रोडवरील खड्डे तातडीने बुजविण्याची मागणीही करण्यात आली.

रस्त्यावर अनधिकृतपणे प्रवासी वाहने थांबविणाऱ्या वाहनचालकांवर तसेच लक्झरी बस आणि मोठी वाहने रस्त्यावर थांबवून प्रवासी घेणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. त्याचबरोबर आवश्यक ठिकाणी बॅरिकेडिंग आणि सिग्नल व्यवस्था करणे, सकाळी आणि सायंकाळच्या गर्दीच्या वेळेत वाहतूक पोलिसांची प्रभावी नियुक्ती करणे तसेच अपघातप्रवण आणि वारंवार वाहतूक कोंडी होणारी ठिकाणे निश्चित करून तेथे कायमस्वरूपी उपाययोजना करण्याबाबतही चर्चा झाली.

बैठकीच्या सुरुवातीला जनसेवक संपत आबा गाडे यांच्या हस्ते श्री गणेशाची पूजा करण्यात आली. बैठकीस जनसेवक संपत आबा गाडे, माहिती सेवा समितीचे अध्यक्ष चंद्रकांत वारघडे, माजी पंचायत समिती सदस्य सुरेश बापू सातव, केसनंदचे सरपंच विशाल हरगुडे, माजी सरपंच दत्तात्रय हरगुडे, सामाजिक कार्यकर्ते हिरामण वाघमारे, तुशार सातव, जगदिश बजाज, कमलेश बहिरट, गणेश जाधव, प्रकाश नागरवाड, पंडित कोलते, संजय टकले, वाघोली वाहतूक विभागाचे प्रमुख अधिकारी किशोर तणपुरे, विक्रम घडदे, गणेश हरगुडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

वाहतूक कोंडी ही केवळ काही व्यक्तींची समस्या नसून हजारो नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित प्रश्न असल्याने नागरिकांनीही सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. वाहतूक नियमांचे पालन करण्याबरोबरच कोंडीच्या ठिकाणांची माहिती, फोटो आणि व्हिडिओ कृती समितीच्या माध्यमातून संबंधित विभागापर्यंत पोहोचविण्याचे आवाहन करण्यात आले. “तात्पुरती वाहतूक व्यवस्था नको, तर वाघोली-केसनंद-लोणिकंद परिसरातील वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा हवा,” अशी भूमिका बैठकीत घेण्यात आली.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

‘त्या’ जेलमध्ये नेमकं घडतंय काय? वाल्मिक कराड प्रकरणात धनंजय देशमुखांची तक्रार; दोन पोलिस निलंबित

Tuesday, 29 September 2026, 16:35

‘चिंतामणी’ला फुलांची सजावट! अंगारकी चतुर्थीनिमित्त थेऊरला भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी..

Tuesday, 29 September 2026, 16:25

उरुळी कांचनमध्ये स्वच्छतेचा बोजवारा! महात्मा गांधी विद्यालयाच्या प्रवेशद्वारावरच कचऱ्याचे ढीग, नागरिकांचे आरोग्य धोक्यात

Tuesday, 29 September 2026, 16:11

कौटुंबिक वादातून सावत्र मुलाचं भयानक कृत्य! गावठी कट्ट्यातून वडिलांवर गोळीबार; बाचाबाची वाद अन् रक्तरंजित थरार…

Tuesday, 29 September 2026, 16:08

उदयपूरच्या शाही लग्नावर कोट्यवधींचा खर्च? केतन अग्रवालच्या वडिलांनी दावा फेटाळला; लग्नाबाबत दिली मोठी माहिती

Tuesday, 29 September 2026, 15:49

मोबाईल अन् दागिने घेण्यासाठी विकलं बाळ! एका महिन्याच्या बाळाचा तब्बल 3 वेळा सौदा; पोलिस तपासात धक्कादायक खुलासा

Tuesday, 29 September 2026, 15:35
Next Post

पुण्यात खळबळ! "चंद्या खाली ये, आज तुला मारुन टाकतो" म्हणत तरुणावर थेट गावठी पिस्तुलातून गोळीबार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp