Sunday, September 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘आई, तू तुझी काळजी घे’ आईला शेवटचं बोलली अन् नंतर उचललं टोकाचं पाऊल; पतीची ‘ती’ एक मागणी अन् संसार उध्वस्त…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 6 September 2026, 19:15

छत्रपती संभाजीनगर: लग्नासाठी माहेरच्यांनी तब्बल १२ लाख रुपये खर्च केल्यानंतरही चारचाकी वाहन घेण्यासाठी माहेरून पैसे आणावेत, या मागणीवरून विवाहितेचा छळ केल्याचा आरोप आहे. पतीकडून मारहाण आणि सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून निकिता ऋषिकेश वाकळे (२३) यांनी आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सुरेवाडी, जाधववाडी येथे घडली. या घटनेनंतर निकिता यांच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून हसूल पोलिसांनी पतीसह सासरच्या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पती ऋषिकेश सोमीनाथ वाकळे (२६) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

निकिता यांचे वडील गणेश अर्जुन पठारे हे बदनापूर तालुक्यातील देव पिंपळगाव येथे राहतात. त्यांच्या तक्रारीनुसार, निकिता आणि ऋषिकेश यांचा चार ते पाच महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. लग्नासाठी माहेरच्या कुटुंबीयांनी सुमारे १२ लाख रुपये खर्च केले होते. मात्र, लग्नानंतर काही दिवसांतच निकिताला सासरच्या मंडळींकडून त्रास देण्यास सुरुवात झाली.

चारचाकी वाहन घेण्यासाठी माहेरून पैसे घेऊन यावेत, अशी मागणी पती ऋषिकेश तिच्याकडे करत असल्याचा आरोप आहे. लग्नात मोठा खर्च झाल्याने निकिताने आणखी पैसे आणण्यास नकार दिला. त्यामुळे ऋषिकेशने तिच्याशी मारहाण केली, तर घरगुती कारणांवरून सासरच्या अन्य मंडळींकडूनही तिचा मानसिक छळ केला जात असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. हा त्रास वाढत गेल्याने निकिताने टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

या प्रकरणी पती ऋषिकेश सोमीनाथ वाकळे, सासू रेखा सोमीनाथ वाकळे, सासरे सोमीनाथ कचरू वाकळे (५३), दीक्षा तांबे (२९), दीर सुमित सोमीनाथ वाकळे (२०), अनिता दामोदर पवार (३५) आणि मंदा हरिदास दारकुंडे (३३, सर्व रा. सुरेवाडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

 

निकिता या देव पिंपळगाव येथील रहिवासी असून बीएस्सीचे शिक्षण घेत होत्या. त्यांचा विवाह जाधववाडी परिसरातील सुरेवाडी येथील ऋषिकेश वाकळे याच्याशी झाला होता. ऋषिकेश हा शहरातील एका धर्मादाय रुग्णालयात नोकरी करत असल्याची माहिती आहे. लग्नानंतर अवघ्या महिनाभरातच निकिताला सासरच्या मंडळींकडून त्रास सुरू झाल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे.

दरम्यान, निकिताच्या भावाने तिच्या पतीच्या अनैतिक संबंधांबाबतही आरोप केला आहे. या सर्व कारणांमुळे निकिता मानसिक तणावात असल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. बुधवारी रात्री निकिताने आईला फोन करून ‘तुझी काळजी घे,’ असे सांगितले होते. त्यानंतर शनिवारी तिचा मृत्यू झाल्याचे समोर आले.

दरम्यान, निकिता यांच्या अंत्यविधीच्या वेळी हडको एन-११ येथील स्मशानभूमीत माहेर आणि सासरच्या नातेवाइकांमध्ये वाद झाला. आरोप-प्रत्यारोप वाढल्यानंतर दोन्ही गटांमध्ये हाणामारी झाली आणि दगडफेकही करण्यात आली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

‘आई, तू तुझी काळजी घे’ आईला शेवटचं बोलली अन् नंतर उचललं टोकाचं पाऊल; पतीची ‘ती’ एक मागणी अन् संसार उध्वस्त…

Sunday, 6 September 2026, 19:15

पुण्यात मेसचालकाचा कारनामा! तरुणीकडून उसने घेतलेले पैसे देण्याच्या बहाण्याने तिला गाडीवर बसवलं; कोल्ड्रिंकमधून गुंगीचं औषध देत निर्जनस्थळी नेऊन….

Sunday, 6 September 2026, 18:28

मुंबईत सिनेस्टाइल बोगस रेड! कारवाई टाळण्यासाठी मागितली १ कोटींची लाच अन् खऱ्या पोलिसांची धाड पडताच…

Sunday, 6 September 2026, 17:51

ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वी सरपंच आरक्षणाचा पुन्हा घोळ; सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने प्रक्रिया अडचणीत

Sunday, 6 September 2026, 17:00

जर्मनीत नोकरीला असलेल्या आयटी इंजिनिअरची कुंजीरवाडीतील राहत्या घरी आत्महत्या; आठ दिवसांपूर्वीच जर्मनीवरून आले होते गावी..

Sunday, 6 September 2026, 16:58

पुणेकरांसाठी मोठी खूशखबर! महामेट्रोचा मोठा निर्णय; आता दर ५ मिनिटांनी धावणार मेट्रो

Sunday, 6 September 2026, 16:17
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp